पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'१३० कोटी भारतीय नवा भारत घडविण्यासाठी प्रयत्नशील'

पीएम मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या थायलंड दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी बँकॉक येथील निंबिब्र स्टेडिअममध्ये 'स्वासदी मोदी' या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित केले. '१३० कोटी भारतीय सध्या नविन भारत घडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ६-७ वर्षापूर्वी भारतात गेलेले आता पुन्हा भारत गेले तर त्यांना देशात झालेला बदल स्पष्टपणे दिसेल.', असे मोदींनी यावेळी सांगितले.  

राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

'आज जर जगात भारताची पोहोच वाढली असेल तर त्यामागे आपल्यासारख्या सहकाऱ्यांची मोठी भूमिका आहे. या भूमिकेला आपल्याला आणखी मजबूत करायचे असल्याचे मोदींनी यावेळी उपस्थित भारतीय वंशाच्या नागरिकांना सांगितले. 'तुम्ही तुमच्या परदेशी मित्रांना सांगू शकता की तुम्ही भारतातून आहात आणि त्यांना सांगा की भारत कोणत्या वेगाने पुढे जात आहे. थायलंडमध्ये आपणास लक्षात आले असेल की जेव्हा जेव्हा भारत बोलतो तेव्हा लोक काळजीपूर्वक ऐकतात.' असे मोदींना यावेळी सांगितले.

आमचं ठरलंय, आम्ही विरोधी पक्षातच बसणार: अजित पवार

तसंच, 'सध्या देशातील लोकसभा निवडणुकीत ६० कोटींपेक्षा अधिक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुषांसोबत महिलांनी सुध्दा मोठ्या प्रमाणात मतदान केले. ६० वर्षानंतर पहिल्यांदाच अशी घटना घडली. ती म्हणजे ५ वर्ष सरकार चालवल्यानंतर त्याच सरकारला आधीपेक्षा जास्त मतं मिळाली. जगातील लोकशाही इतिहासातील ही सर्वात मोठी घटना आहे. याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे.' असे मोदी म्हणाले. 

सरकारविरोधात काँग्रेस करणार आंदोलन; विरोधी पक्षांची बोलावली बैठक

गेल्या ५ वर्षात मला जगातील अनेक देशांमध्ये जाण्याची संधी मिळाली. प्रत्येक ठिकाणी भारतीय समुदायाला भेटण्याचा प्रयत्न केला. आज तुम्ही मला मोठ्या संख्येने आशीर्वाद देण्यासाठी आले यासाठी मोदींनी सर्वांचे आभार मानले. तसंच, 'भारत आणि थायलंडमधील संबंध फक्त सरकारांमध्येच नाहीत. इतिहासाच्या प्रत्येक क्षणाने, इतिहासाच्या प्रत्येक घटनेने आपले नाते विकसित केले आहे, विस्तृत केले आहे. आणि नवीन उंचीवर घेऊन गेले आहे. हे नाते हृदय, आत्म्या, विश्वास आणि अध्यात्माचे आहे', असे मोदींनी सांगितले. 

शरद पवार मुंबईत, राजकीय हालचालींना वेग