पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ६९ वा जन्मदिवस; भाजपकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी याचा आज ६९ वा जन्मदिवस आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ते आपला जन्मदिवस गुजरातमध्ये साजरा करणार आहेत. जन्मदिवस साजरा करण्यासाठी मोदी सोमवारी रात्रीच अहमदाबाद येथे दाखल झाले. जन्मदिवसानिमित्त मोदी गुजरातचा दौरा करणार आहेत. सकाळीच ते आई हिराबेन यांची भेट घेऊन आशिर्वाद घेणार आहेत. त्यानंतर गुजरातच्या वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.

निवडणूक आयोगाची उद्या मुंबईत बैठक, लवकरच तारखा जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी जन्मदिवसानिमित्त सर्वात आधी आई हिराबेन यांची भेट घेऊन त्यांचे आशिर्वाद घेणार आहेत. त्यानंतर ते केवाडिया येथील सरदार सरोवर धरण येथे जाणार आहे. त्याठिकाणी आयोजित केलेल्या 'नमामि देवी नर्मदे' या महोत्सवाचे उद्घघाटन करणार आहेत. मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याने सरदार सरोवर धरणाला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. या धरणाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १७ सप्टेंबर २०१७ रोजी झाले होते. दोन वर्षात धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली असून सध्या १३८.६८ मीटर ऐवढा पाणीसाठा आहे.

काश्मीरप्रकरणी पाठिंबा मागत असलेल्या पाकला मुस्लिम देशांचा सल्ला

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त दिल्ली भाजपने 'सेवा सप्ताह' साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यानिमित्ताने दिल्ली भाजप वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यक्रम आयोजित करणार आहे. दिल्लीत भाजपच्या युवा मार्चा कार्यकर्त्यांनी खासदार मनोज तिवारी यांच्यासह मोदींच्या जन्मदिवसानिमित्त केक कापला. तसंच, मोदींच्या जन्मदिवसानिमित्त भाजपकडून आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात भाजपचे सर्व नेत मंडळी सहभागी होणार आहेत. या दरम्यान स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहे. तसंच रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात येणार आहे.  

धोनीबद्दल चेन्नई सुपर किंग्जच्या मालकांनी स्पष्ट केली भूमिका