पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

संसदेच्या कँटिनमध्ये लवकरच 'महागाई', नॉनव्हेज पदार्थही कमी करणार

संसद भवन

संसदेच्या कँटिनमध्ये मिळणाऱ्या पदार्थांचे दर वाढविण्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. त्याचबरोबर या कँटिनमध्ये मिळणाऱ्या पदार्थांवर दिले जाणारे अंशदानही काढून घेण्याचा विचार आहे. या दोन्ही कारणांमुळे येत्या काही महिन्यांमध्ये संसदेच्या कँटिनमधील पदार्थांचे दर वाढतील. कँटिनच्या मेन्यूमध्ये असणाऱ्या पदार्थांची संख्याही कमी केली जाईल. ज्या पदार्थांना ग्राहकांकडून कधीच मागणी नसते. ते मेन्यूमधून काढून टाकले जातील. यामध्ये काही मांसाहारी पदार्थांचाही समावेश आहे. अर्थात सर्व मांसाहारी पदार्थ मेन्यूमधून काढून टाकले जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये जाणारे केंद्रीय मंत्री डरपोकः मणिशंकर अय्यर

या संदर्भात लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारी रोजी सुरू होते आहे. या अधिवेशनाचे दोन टप्पे असणार आहे. दोन टप्प्यांच्या मध्ये जी सुट्टी असेल त्यावेळी या संदर्भात निर्णय घेतला जाईल. त्याचवेळी कँटिनमधील पदार्थांचे नवे दर जाहीर केले जातील. 

संसदेच्या कँटिनमधील पदार्थांचे नवे दर काय असतील, हे निश्चित करण्यासाठी कोणतीही समिती तयार करण्यात आलेली नाही. स्वतः ओम बिर्ला हेच यामध्ये लक्ष घालत आहेत. संसदेचे कँटिन हे उत्तर रेल्वेकडून चालविले जाते. सध्या या कँटिनसाठी सरकारकडून किती अंशदान दिले जाते आणि किती खासदार या ठिकाणी जाऊन जेवतात, याची माहिती ओम बिर्ला यांनी मागविली होती. त्यांना देण्यात आलेल्या माहितीनुसार, संसदेच्या कँटिनसाठी १७ कोटी रुपयांचे अंशदान दिले जाते. त्याचवेळी खूप कमी खासदार या ठिकाणी अधिवेशन काळात जेवतात.

...म्हणून 'टुकडे-टुकडे गँग' या वक्तव्यामुळे अमित शहा अडचणीत सापडणार

खरंतर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापासूनच कँटिनमधील पदार्थांचे नवे दर अमलात येणार होते. पण अत्यंत व्यग्र दिनक्रमामुळे नवे दर नक्की किती असतील, याचा निर्णय घेण्यास ओम बिर्ला यांना वेळ मिळाला नाही. त्याचबरोबर सध्या या कँटिनमध्ये मिळणाऱ्या ४८ पदार्थांमध्येही कपात केली जाणार आहे. जे पदार्थ ग्राहकांकडून कधीच मागविले जात नाहीत, ते मेन्यूमधून काढून टाकण्यात येणार आहेत.