पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीर खोऱ्यातील बदल तेथील जनतेसाठी फायदेशीर ठरेल : राष्ट्रपती

राष्ट्रपती रामनाथ कोविंद

President Ramnath Kovind Speech: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ७३ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी राष्ट्राला संबोधित केले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.  

ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यदिनाचा उत्सव हा देश तसेच परदेशात असलेल्या प्रत्येक भारतीयसाठी आनंदाचा दिवस आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी  संघर्ष, त्याग आणि बलिदान करणाऱ्यांनी आपल्यासाठी एक आदर्श घालून दिला. ते आपल्याला विसरता कामा नये. राष्ट्रपिता महात्मा गांधी आपल्या स्वातंत्र्य संग्रामातील महानायक होते. समाजातील अन्यायाविरुद्ध त्यांनी लढा दिला. हा आदर्श घेऊनच आपल्याला पुढील वाटचाल करायची आहे, असे राष्ट्रपती यावेळी म्हणाले. २ ऑक्टोबरला महात्मा गांधीजींची १५० वी जयंती उत्साहात साजरी केली जाणार असल्याचा उल्लेखही त्यांनी भाषणामध्ये केला.

आम्ही युद्धासाठी सज्ज, पाक पंतप्रधानांची भारताला धमकी

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या निर्णयावर देखील त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, काश्मीर आणि लडाखमधील बदल हा काश्मीर खोऱ्यातील जनतेसाठी फायदेशीर ठरेल. लोकांनी दिलेल्या जनादेशाने जनतेच्या आकांक्षाची कल्पना येते. त्यांची आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. १३० कोटी भारतवासियांमधील कौशल्य, प्रतिभा देशालाच्या विकासात महत्त्वपूर्ण भुमिका पार पाडेल. भारत तरुणांचा देश आहे. अनेत क्षेत्रात आपण उल्लेखनिय कामगिरी करत आहोत, असेही ते म्हणाले.

जम्मू-काश्मीरचे माजी IAS अधिकारी शाह फैजल पोलिसांच्या ताब्यात