पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विरोधाच्या नावाखालील हिंसाचार देशालाच कमकुवत करतो: राष्ट्रपती

राष्ट्रपती रामनाथ कोविंद

आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाला सुरुवात झाली. अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दोन्ही सभागृहांना संबोधित केले. यावेळी त्यांनी गेल्या ५ वर्षात भाजप सरकारने केलेल्या विकास कामांचा आढावा दिला. त्याचसोबत हे सरकार जनतेच्या अपेक्षापूर्तींसाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. तसंच, 'विरोधाच्या नावाखाली होणारा हिंसाचार देशाला आणि समाजालाच कमकुवत करतो, असे राष्ट्रपतींनी सांगितले. 

'आर्थिक विषयांवरील चर्चा केंद्रस्थानी राहावी'

राष्ट्रपतींनी पुढे असे सांगितले की, चर्चा वादविवाद लोकशाहीला बळकट करतात. मात्र विरोधाच्या नावाखाली होणारा हिंसाचार हा समाज आणि देशाला कमकुवत करतो. नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वप्न पूर्ण झाले. तसंच त्यांनी जम्मू-काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवणं हे ऐतिहासिक पाऊल असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.  

CAAविरोधात संसद परिसरात विरोधकांचे आंदोलन

तसंच, 'सबका साथ, सबका विकास हा सरकारचा मंत्र आहे. येणारे दशक भारतासाठी महत्वाचे आहे. नव्या ऊर्जेंने नव्या भारताला गती द्यायची आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले. देशातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. नव्या भारताच्या निर्मितीसाठी सर्व जण उत्सुक आहेत. या नव्या भारतात प्रत्येकाला संधी मिळेल, असे देखील त्यांनी संगितले. 

औरंगाबादमध्ये भाविकांच्या गाडीला अपघात; चौघांचा मृत्यू

दरम्यान, राम जन्मभूमीच्या निर्णयानंतर देशाने परिपक्वता दाखवली, असे राष्ट्रपतींनी सांगितले. ८ कोटी जनतेला मोफत गॅस कनेक्शन दिले. २४ कोटी लोकांना विमा सुरक्षा दिली. तसंच, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जम्मू-काश्मीरमध्ये जवळपास ३ हजार ५०० घरं तयार करण्यात आली. तर दोन वर्षात त्याठिकाणी २४ हजार पेक्षा जास्त घरांची निर्मिती करण्यात आली. जम्मू-काश्मीर आणि लदाखचा विकास वेगाने होत असल्याचे देखील राष्ट्रपतींनी सांगितले. 

तिहार तुरुंगात पवन जल्लाद दाखल, फाशीची तयारी पूर्ण

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:president ramnath kovind says any violence in name of protest makes society and country weaker