पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीत अग्नितांडवः राष्ट्रपती कोविंद, PM मोदींनी व्यक्त केले दुःख

दिल्लीतील एका इमारतीला भीषण आग लागल्यामुळे ४३ जणांचा मृत्यू झाला आहे.(Sanchit Khanna/ HT Photo)

दिल्लीतील धान्य बाजार परिसरातील एका इमारतीला रविवारी पहाटे भीषण आग लागल्यामुळे ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे दिल्लीत खळबळ उडाली आहे. दुसरीकडे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टि्वट केले, दिल्लीतील धान्य बाजार परिसरात लागलेल्या आगीचे वृत्त ऐकून अत्यंत दुःख झाले आहे. पीडित कुटुंबींसाठी मी प्रार्थना करतो. जखमी रुग्ण लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो. स्थानिक पातळीवर नागरिकांना वाचवण्यासाठी चांगले काम केले जात आहे. 

पंतप्रधान मोदींनी या भयावह घटनेवर दुःख व्यक्त करत टि्वटमध्ये म्हटले की, दिल्लीतील राणी झांसी रस्त्यावरील धान्य बाजारात आगीची दुर्घटना अत्यंत भयावह आहे. आपल्या निकटवर्तीयांना गमावणाऱ्या लोकांप्रती मी संवेदना जाहीर करतो. जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासनाकडून प्रत्येक प्रकारची मदत उपलब्ध करुन दिली जात आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही टि्वट केले. नवी दिल्लीत आग लागल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. आपल्या निकटवर्तीयांना गमावणाऱ्यांच्या प्रती मी संवेदना व्यक्त करतो. बाधितांना हरतऱ्हेची मदत देण्याचे स्थानिक प्रशासनाला मी निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अग्निशामक दलाचे कौतुक करत टि्वटमध्ये म्हटले की, हे अत्यंत वेदनादायी वृत्त आहे. मदतकार्य सुरु आहे. अग्निशामक दलाकडून सातत्यपूर्ण मदत केली जात आहे. जखमींना रुग्णालयात नेले जात आहे. 

राहुल गांधी यांनीही आपल्या संवेदना व्यक्त केल्या. दिल्लीतील धान्य बाजारात भीषण आग लागल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाल्याचे समजल्यानंतर मला धक्का बसला. मृतांच्या नातेवाईकांप्रती मी संवेदना व्यक्त करतो आणि जखमी रुग्ण लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो, असे टि्वट त्यांनी केले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:president ramnath kovind pm modi Rahul Gandhi cm arvind kejriwal expresses grief over Delhi fire incident