पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तिहेरी तलाक विरोधी कायदा लागू, राष्ट्रपतींची मंजुरी

तिहेरी तलाक विरोधी कायदा

देशामध्ये तिहेरी तलाक विरोधी कायदा लागू झाला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी तिहेरी तलाक विरोधी विधेयकावर स्वाक्षरी केली. तिहेरी तलाक विरोधी कायदा 19 सप्टेंबर 2018 पासून लागू झाला आहे. दरम्यान, लोकसभेपाठोपाठ मंगळवारी राज्यसभेतही तिहेरी तलाक विरोधी विधेयक मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने ९९ मतं पडली तर विरोधामध्ये ८४ मतं पडली. त्यानंतर हे विधेयक स्वाक्षरीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवण्यात आले होते. गुरुवारी रात्री राष्ट्रपतींनी या विधेयकावर स्वाक्षरी केल्या. त्यामुळे आता तिहेरी तलाक विरोधी विधेयकाचे कायद्यामध्ये रुपांतर झाले आहे.  

... त्यांचे ह्रदय तपासावे लागेल, शरद पवार यांचा पक्ष सोडणाऱ्यांना टोला

तिहेरी तलाक विरोधी कायदा झाल्यामुळे आता 19 सप्टेंबर 2018 पासून तिहेरी तलाकची जेवढी प्रकरण समोर आली आहेत त्यावर या कायद्याअंतर्गत कारवाई केली जाणार आहे. तसंच तिहेरी तलाक विरोधी कायद्यानुसार तिहेरी तलाक देणाऱ्या पुरुषाला 3 वर्षाची शिक्षा होणार आहे. तसंच पीडित महिला आपल्यासाठी आणि मुलांच्या उदरनिर्वाहासाठी पोटगी मागू शकते. 

जनगणना २०२१ हायटेक, स्वतः ऑनलाईन माहिती भरण्याची सुविधा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार 2 ने पहिल्या संसदीय सत्रामध्ये आतापर्यंत 10 विधेयकांना मंजुरी दिली आहे. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये या विधेयकांना मंजुरी मिळाल्यानंतर ते स्वाक्षरीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवण्यात आले होते. राष्ट्रपतींनी या 10 ही विधेयकांवर स्वाक्षरी केल्या असून त्याचे रुपांतर आता कायद्यामध्ये झाले आहे. 

भावोजी अस्त्र: आदेश बांदेकर साधणार माऊलींशी संवाद