पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

न्या. शरद बोबडे यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती, १८ नोव्हेंबर पदभार स्वीकारणार

न्यायमूर्ती शरद बोबडे

न्यायमूर्ती शरद बोबडे हे नवे सरन्यायाधीश असतील. न्यायमूर्ती बोबडे यांच्या नियुक्तीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. १८ नोव्हेंबर रोजी शरद बोबडे हे नवे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील. 

बोअरवेलचा आणखी एक बळी, ७५ तासांचे प्रयत्न अयशस्वी

सरन्यायाधीश रंजन गोगोई हे १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. ३ ऑक्टोबर २०१८ रोजी देशाचे ४६ वे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी थपथ घेतली होती.

निवृत्तीपूर्वी परंपरेनुसार रंजन गोगोई यांनी सरन्यायाधीशपदी शरद बोबडे यांच्या नावाची शिफारस केली होती. बोबडे यांच्या नियुक्तीपत्रावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली असून ते देशाचे ४७ वे सरन्यायाधीश  म्हणून पुढील महिन्यात पदभार स्वीकारणार आहेत. 

इक्बाल मिर्चीसंबधीत प्रकरणावरून शिल्पा शेट्टीच्या पतीला ईडीची नोटीस

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:President Ram Nath Kovind signs warrant appointing Justice Sharad Arvind Bobde as the next Chief Justice of India