पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भया प्रकरण: दोषी पवनची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली

पवन कुमार गुप्ता

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन कुमार गुप्ताची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळली आहे. याप्रकरणातील चारही दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर पवनने राष्ट्रपतींकडे दया याचिका पाठवली होती. राष्ट्रपतींनी बुधवारी त्याची दया याचिका फेटाळली. याआधी पवनने सर्वोच्च न्यायालयात निर्णय सुधार याचिका दाखल केली होती. सोमवारी ही याचिका न्यायालयाने फेटाळली होती. 

चिथावणीखोर वक्तव्ये, सुप्रीम कोर्टाकडून दिल्ली हायकोर्टावर ताशेरे

दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी फाशीची शिक्षा ठोठावलेल्या चारही दोषींची मानसिक आणि शारीरिक तपासणी करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला (एनएचआरसी) निर्देश देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला. मुख्य न्यायाधीश डी. एन पटेल आणि न्यायमूर्ती सी. हरी शंकर यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. या याचिकेवर सुनावणी करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.  

कोरोनाचे देशात २८ रुग्ण, आणखी १९ लॅब सुरू करणार - आरोग्य मंत्री

दरम्यान, सोमवारी चारही दोषींच्या फाशीच्या अंमलबजावणीला दिल्लीतील पतियाळा हाऊस न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली. याप्रकरणातील चारही दोषींना ३ मार्च रोजी सकाळी ६ वाजता फाशी देण्यात येणार होती. मात्र कोर्टाच्या आदेशनांतर त्यांची फाशी टळली. दिल्लीमध्ये २०१२ रोजी निर्भयावर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर तिला चालत्या बसमधून फेकण्यात आले होते. उपचारा दरम्यान निर्भयाचा मृत्यू झाला होता. 

कोरोनामुळे होळी मिलन कार्यक्रमात सहभागी न होण्याचा मोदींचा निर्णय

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:president ram nath kovind rejects the mercy plea of the 2012 delhi gang rape case convict pawan