पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई राज्यसभेवर, राष्ट्रपतींकडून नियुक्ती

राष्ट्रपतींकडून माजी सरन्यायाधीशांच्या नावाची राज्यसभेसाठी शिफारस

राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेच्या जागेसाठी माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. गृहमंत्रालयाने सोमवारी अधिसूचना काढून यासंदर्भातील माहिती दिली आहे. देशातील वेगवेगळ्या क्षेत्रातील १२ मंडळींची राज्यसभेवर नियुक्ती करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना असतात. या अधिकाराखाली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी माजी सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस केली. राष्ट्रपतींनी सरन्यायाधीशांच्या नावाला पसंती देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

निर्भयाच्या दोषींनी ठोठावला आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा दरवाजा

देशातील अनेक  महत्त्वपूर्ण प्रकरणाचा निकाल रंजन गोगोई यांनी दिला होता. यात राम जन्मभूमीच्या जागेसंदर्भातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला खटला, आसाममध्ये एनआरसी लागू करण्यासंदर्भातील निर्णय आणि राफेल विमानांच्या खरेदीसंदर्भात गाजलेल्या प्रकरणाचा निकाल हा रंजन गोगोई यांच्या काळात लागला होता.   

राज्यपालांच्या भेटीनंतर CM कमलनाथ म्हणाले, आम्ही बहुमत सिद्ध करु!

१० जानेवारी २०१८ मध्ये भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली होती. यात न्यायमूर्ती कुरियन जोसेफ,न्यायमूर्ती जे चेलमेश्वर, न्यायमूर्ती मदन लोकूर यांच्यासह न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नावाचाही समावेश होता. सर्वोच्च न्यायालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी तत्कालीन मुख्य न्यायाधीश दिपक मिश्रा यांच्यावर आरोप केले होते.