पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मू-काश्मीरमध्ये भारताची घटना लागू, राष्ट्रपतींकडून आदेश जारी

राष्ट्रपती रामनाथ कोविंद

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी जम्मू-काश्मीर सरकारशी संबंधित संविधान (जम्मू काश्मीरमध्ये लागू) आदेश २०१९ लागू केला आहे. ज्यामध्ये राज्यात भारताचे संविधान लागू करण्याची तरतूद आहे. राष्ट्रपतींनी संविधान (जम्मू-काश्मीरमध्ये लागू) आदेश २०१९ जारी केला असून त्यांची तात्काळ प्रभावाने अंमलबजावणी सुरु झाली आहे. हा जम्मू-काश्मीर मध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या १९५४ च्या आदेशाची जागा घेईल. राष्ट्रपतींनी संविधानाच्या कलम ३६७ मधील उपकलम ४ शी जोडला आहे. यामध्ये चार बदल करण्यात आले आहेत, असे सरकारने म्हटले आहे. 

कलम 370: केंद्राकडून लष्कर आणि वायूदलाला हाय अलर्ट जारी

'भाषा'ने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या व्यक्तीला राज्य विधानसभेच्या शिफारशीवर राष्ट्रपतींकडून जम्मू आणि काश्मीरच्या 'सदर ए रियासत', जे स्थानिक रुपात राज्याच्या मंत्रिपरिषदेच्या सल्ल्यावर कार्य करत आहे. त्याला स्थानिक रुपात मान्यता दिली आहे. त्यांना देण्यात आलेले निर्देश जम्मू आणि काश्मीरच्या राज्यपालांसाठीचे निर्देश मानले जातील.

Article 370: बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं: उद्धव ठाकरे