पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ट्रम्पसमोर मोदी म्हणाले, काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा, आमचं आम्ही बघू!

मोदी-ट्रम्प यांच्यात काश्मीर मुद्द्यावर चर्चा

काश्मीर हा भारत-पाकमधील द्विपक्षीय मुद्दा आहे, यावर चर्चेतून तोडगा काढू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. जी ७ परिषदेच्या निमित्ताने मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांची भेट घेतली. यावेळी दोन नेत्यांमध्ये काश्मीरच्या महत्त्वपूर्ण मुद्यावर चर्चा झाली. काश्मीरच्या मुद्यावर भारत-पाक यांच्यातील तणावपूर्ण संबंधाच्या पार्श्वभूमीवर मध्यस्थी करण्याची तयारी यापूर्वी ट्रम्प यांनी दर्शवली होती.

मोदी-ट्रम्प भेटीची इम्रान खान यांना धास्ती

ट्रम्प यांच्यासोबतच्या प्रत्यक्ष भेटीमध्ये मोदींनी काश्मीर मुद्दा हा भारत-पाक यांच्यातील द्विपक्षीय मुद्दा असल्याचे म्हटले. यावेळी मोदी म्हणाले, १९४७ पूर्वी भारत-पाक एकत्र होते. काश्मीरचा मुद्दा द्विपक्षीय आहे. आम्ही याविषयी चर्चेतून तोडगा काढू. काश्मीर मुद्यासंदर्भात आम्हाला कोणत्याही त्रयस्त राष्ट्राला त्रास देवू इच्छित नाही, असे मोदी यावेळी म्हणाले. भारत आणि पाकिस्तान एकत्रपणे चर्चा करु शकतात, असे मोदी म्हणाले.  

सर्जिकल स्ट्राईकमुळे देशातील बेरोजगारी हटणार नाहीः संजय 

ट्रम्प यांनी देखील मोदींच्या विधानाला दुजोरा दिला  काश्मीरचा मुद्दा द्विपक्षीय असून भारत-पाक आपापसात चर्चेतून शांततापूर्व मार्गाने काश्मीरचा तिढा सोडवतील, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:President Donald Trump and PM Modi are likely to discuss the situation in Kashmir among other bilateral matters