पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली विधानसभेसाठी प्रशांत किशोर यांची आम आदमी पक्षाला साथ

अरविंद केजरीवाल

दिल्लीमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने निवडणूक प्रचार धोरण तज्ज्ञ प्रशांत किशोर यांच्या आयपॅकशी करार केला आहे. गेल्या निवडणुकीत दिल्लीमध्ये आपने अभूतपूर्व यश मिळवले होते. आता या निवडणुकीत प्रशांत किशोर यांची साथ त्यांना मिळाल्याने आम आदमी पक्षाला निवडणुकीत पुन्हा यश मिळणार का हे पाहावे लागेल.

जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यात बदल

आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी शनिवारी सकाळी ट्विटच्या माध्यमातून निवडणुकीतील प्रचार धोरण प्रशांत किशोर यांच्या कंपनीच्या नेतृत्त्वाखाली बघितले जाईल, असे म्हटले आहे. अरविंद केजरीवाल यांनीही आयपॅक आमच्यासोबत येत असल्याचा आनंद असल्याचे ट्विटच्या माध्यमातून सांगितले.

२०१४ मध्ये देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपला मिळालेल्या यशात प्रशांत किशोर यांचा वाटा होता. त्यावेळी त्यांनी भाजपला मदत केली होती. खुद्द प्रशांत किशोर सध्या संयुक्त जनता दलाचे उपाध्यक्षही आहेत. २०१५ मध्ये बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल, संयुक्त जनता दल आणि काँग्रेसच्या विजयातही प्रशांत किशोर यांची मोठी भूमिका होती.

मी मरण पत्करेल पण माफी मागणार नाही: राहुल गांधी

२०१७ मधील उत्तर प्रदेशमधील निवडणुकीत आयपॅकने काँग्रेससाठी काम केले होते. तिथे त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही.