पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महाराष्ट्राच्या प्रांजल पाटील पहिल्या दृष्टिहीन महिला आयएएस अधिकारी

पहिल्या दृष्टिहीन महिला आयएएस अधिकारी

भारतातील पहिल्या दृष्टिहीन महिला आयएएस अधिकारी प्रांजल पाटील यांनी सोमवारी तिरुवअनंतपुरम येथे उपजिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली. प्रांजल या महाराष्ट्रातील उल्हासनगर इथल्या रहिवाशी आहेत. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी दृष्टी गमावली. पण नियतीसमोर हार न मानता जिद्दीच्या जोरावर त्यांनी यश संपादन केलं.

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ३ हजार ८३० कोटींची मालमत्ता जप्त

'आपण कधीही हार स्वीकारली नाही पाहिजे, प्रत्येक गोष्टीवर मेहनत घेतली पाहिजे आपल्याला स्वत:ला सिद्ध करण्याची एक संधी नक्की मिळते', असं ३० वर्षांच्या प्रांजल म्हणाल्या. 

भाजपवाले शिवसेनेची रोज इज्जत काढताहेत, राज ठाकरेंचा वर्मी घाव

प्रांजल या केरळ कॅडरमध्ये नियुक्त होणाऱ्या पहिल्या दृष्टिहीन आयएएस अधिकारी आहेत. २०१६ मध्ये त्या युपीएससी परीक्षेत ७७३ व्या आल्या होत्या. मात्र नंतर अभ्यासात प्रगती करून त्यांनी १२४ वा स्थान पटकाला.