पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

खासदारांची संख्या १ हजार झाली पाहिजे, प्रणव मुखर्जींचा सल्ला

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

लोकसभेच्या  जागा आता वाढवल्या पाहिजे असा सल्ला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिला आहे. २०२६ पर्यंत लोकसभेत आणि राज्यसभेत खासदारांची संख्या ही १ हजार झाली पाहिजे असं त्यांनी सुचवलं आहे.  गेल्या काही वर्षांत भारताची लोकसंख्या वाढली आहे, त्यामुळे आता प्रतिनिधित्त्व करणाऱ्या खासदारांच्या  संख्येत वाढ केली पाहिजे असं ते म्हणाले. 

जामिया हिंसाप्रकरणी १० जणांना अटक

यासाठी त्यांनी लोकसंख्या वाढीचा दाखला दिला. २०११ च्या तुलनेत प्रत्येक मतदार संघातील मतदारांची संख्या वाढली आहे.  एक खासदार हा जवळपास  १६ लाख लोकसंख्येचं प्रतिनिधीत्त्व करत आहे  त्यामुळे आता खासदारांची संख्या २०२६ पर्यंत १ हजारां र्यंत वाढवली पाहिजे असंही ते म्हणाले.  

ऑस्करच्या शर्यतीतून 'गली बॉय' बाहेर

खासदारांची संख्या वाढल्यानंतर त्यांना बसण्यासाठी संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये लोकसभेचं सभागृह बनवता येऊ शकतं तर लोकसभेच्या सभागृहाचं  राज्यसभेत रुपांतर केलं जाऊ शकतं, असाही पर्याय त्यांनी सुचवला आहे.