पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदी कॅबिनेटमध्ये पुन्हा एकदा तिहेरी तलाक विधेयक मंजूर

प्रकाश जावडेकर

मोदी सरकारने पुन्हा एकदा संसदेमध्ये तिहेरी तलाक विधेयकाला मंजूरी दिली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आगामी संसदीय अधिवेशनात तिहेरी तलाक विधेयक सादर करणार असल्याची माहिती दिली. यापूर्वी मोदी सरकारने आपल्या पहिल्या पाचवर्षांच्या कालावधीत फेब्रुवारी २०१९ मध्ये देखील विधेयकाला मंजूरी दिली होती. सोमवार पासून सुरु होणाऱ्या संसदीय अधिवेशनात नव्याने विधेयक सादर करण्यात येणार असल्याची माहिती जावडेकरांनी यावळी दिली.  

संसदीय अधिवेशनात तिहेरी तलाक विधेयक सादर कल्यानंतर यावेळी राज्यसभेत देखील विधेयकाला मंजूरी मिळेल, असा विश्वास जावडेकरांनी व्यक्त केला. याशिवाय कॅबिनेटने काश्मीर आरक्षण विधेयकाला मंजूरी दिल्याची माहितीही जावडेकरांनी दिली. या विधेयकाने आंतरराष्ट्रीय सीमेलगत लागून असलेल्या लोकांना दिलासा मिळणार आहे. 

राज्य सरकारचा पवारांना धक्का, नीरेचे पाणी उजव्या कालव्यात 

दरम्यान, यापूर्वी मोदी सरकारने लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकाला मंजूरी दिली होती. मात्र विरोधकांच्या विरोधामुळे सरकारला हे विधेयक राज्यसभेत सादर करता आले नव्हते. १७ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन १७ जूलै पासून सुरु होत असून या अधिवेशनात सरकारकडून तिहेरी तलाक विधेयक सादर करण्यात येणार आहे. नव्याने सादर करण्यात येणारे विधेयक राज्यसभेत मंजूर होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 
उल्लेखनिय आहे की, मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील कॅबिनेटची पहिली बैठक आज (बुधवारी) पार पडली. या बैठकीत आगामी पाच वर्षांतील योजनांसदर्भात देखील चर्चा करण्यात आली. 

अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला, CRPF चे ५ जवान शहीद

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:prakash javadekar says modi govt introduce triple talaq bill in the upcoming parliament session