पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'NPRसाठी कोणत्याही पुराव्याची गरज नाही, जनतेवर आमचा पूर्ण विश्वास'

प्रकाश जावडेकर

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) अद्ययावत करण्यासाठी आणि अटल भूजल योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अद्ययावत करण्याला मंत्रिमंडळाची मंजुरी

प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, मोबाईल अॅपद्वारे जनगणना केली जाणार आहे. ब्रिटीश काळानुसार चालत आलेल्या पध्दतीनुसार जनगणना होणार आहे. जनगणना बायोमॅट्रीक पध्दतीने नाही तर मोबाईल अॅपद्वारे होणार आहे. जनगणनेची संपूर्ण प्रक्रिया ६ महिन्यात पूर्ण केली जाणार आहे. एनपीआरसाठी एकूण १३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचे जावडेकर यांनी सांगितले. 

CAA: राहुल आणि प्रियांका गांधींना मेरठ शहराबाहेर पोलिसांनी

२०१० पासून एनपीआरला सुरुवात झाली. देशात ही १६ वी जनगणना होणार आहे. स्वातंत्र्यानंतरची ही आठवी जणगणना असणार आहे, असे जावडेकर यांनी सांगितले. तसंच, जनगणनेची प्रक्रिया २०२० च्या एप्रिल ते सप्टेंबर महिन्यापर्यंत चालणार आहे. लाखो लोकांना यामध्ये सहभागी केले जाणार आहे. टेक्नॉलॉजीचा वापर करुन ही प्रक्रिया सोपी करण्याचे काम केले गेले आहे. त्यासाठी एक मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहे. या अॅपद्वारे तुम्ही माहिती भरु शकणार आहात. सर्व योग्य लाभार्थींना याचा फायदा होणार असल्याचे जावडेकरांनी सांगितले. 

मोदी की शहा, कोण खरं बोलत आहे?, ओवेसींचा सवाल

पुढे प्रकाश जावडेकर यांनी असे सांगितले की, केंद्रीय मंत्रिमंडळाने अटल भूजल योजनेला मंजुरी दिली आहे. अटल भूजल योजनेसाठी ६ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेचा फायदा मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राला होणार आहे. २५ डिसेंबर रोजी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आहे. यानिमित्ताने मोदी सरकारने 'अटल भूजल योजना' सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे. 

बंगालमध्ये विद्यार्थ्यांनी राज्यपालांना अडवले, काळे झेंडेही दाखवले

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:prakash javadekar says cabinet has approved the conducting of census of india 2021 and updating of NPR