पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

६ हजार कोटींच्या अटल जल योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

प्रकाश जावडेकर

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने सुरु करण्यात येणाऱ्या अटल जल योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली. तसंच, मंत्रिमंडळानेही 'अटल बोगद्या'साठी चार हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत, असे देखील त्यांनी सांगितले. 

मनसे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचे सूचक ट्विट

याशिवाय मंत्रिमंडळाने स्वदेश पर्यटन योजनेसाठी १ हजार ८५४ कोटींच्या योजनेला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत १५ सर्कीट विकसित केले जाणार आहेत. प्रकाश जावडेकर यांनी एनपीआरबद्दल सांगितले की, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीमध्ये कोणताही पुरावा किंवा बायोमेट्रिक लागणार नाही. या व्यतिरिक्त राष्ट्रीय जनगणना कार्यक्रम सुरू झाला आहे.

मायावतींनी HM अमित शहांचे चॅलेंज स्वीकारलं

दरम्यान, लखनऊमधील अटल मेडिकल सेंटरलाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. याव्यतिरिक्त, रेल्वे मंडळाची पुनर्रचना केली जाईल. भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा सुरू करण्यास देखील आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. 

...तर मनसेविरोधात कोर्टात जाणार; विनोद पाटील यांचा इशारा

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:prakash javadekar says cabinet approves atal jal mission scheme project worth rs 6 thousand crore