पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तब्येत बिघडल्याने प्रज्ञासिंह ठाकूर यांची कोर्टात सुनावणीला अनुपस्थिती

प्रज्ञासिंह ठाकूर

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीला सलग दुसऱ्यांदा या प्रकरणातील आरोपी आणि खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी अनुपस्थिती लावली. मुंबईत गुरुवारी झालेल्या सुनावणीस त्या आल्या नाहीत. प्रज्ञासिंह ठाकूर यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्यामुळे त्या भोपाळहून मुंबईला प्रवास करू शकत नाही, असे त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. 

'३५० खासदार आहेत, राम मंदिरसाठी आणखी काय हवंय?'

प्रज्ञासिंह ठाकूर यांना बुधवारी रात्री पोटदुखीचा त्रास होऊ लागल्यामुळे भोपाळमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांनंतर गुरुवारी सकाळी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. भोपाळमध्ये एका कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाला त्या उपस्थित राहणार आहेत. तो कार्यक्रम झाल्यावर त्या पुन्हा रुग्णालयात दाखल होणार आहेत. प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या स्वीय सहायक उपमा यांनी पीटीआयला ही माहिती दिली. 

मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्यामध्ये मुंबईतील विशेष न्यायालयापुढे हजर होण्याचे आदेश प्रज्ञासिंह ठाकूर यांना न्यायालयाने दिले होते. पण या आठवड्यात सलग दुसऱ्यांदा त्यांनी येणे टाळले. आता न्यायालयापुढे हजर होण्यासाठी त्यांच्यापुढे एकच दिवस शिल्लक आहे.  

प्रफुल्ल पटेल यांची ईडीच्या चौकशीला गैरहजेरी

न्यायालयात हजर होण्यापासून आपल्याला सवलत मिळावी, अशी मागणी गेल्या सोमवारी त्यांनी केली होती. पण विशेष न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळली होती. काही दिवसांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रज्ञासिंह ठाकूर भोपाळमधून भाजपच्या तिकिटावर विजयी झाल्या होत्या.