पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पक्षाचा शब्द तो माझा शब्द, प्रज्ञासिंह ठाकूर यांचा माफीनामा

प्रज्ञासिंह ठाकूर

उत्तर प्रदेशमधील भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. माझी भाजप पक्षावर निष्ठा आहे. कार्यकर्ती या नात्याने पार्टीचा शब्द हा माझा शब्द आहे. अशा शब्दात त्यांनी माफी मागितली. कमल हासन यांनी नथुराम गोडसे याला पहिला हिंदू दहशतवादी संबोधल्यानंतर भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसे देशभक्त होते, देशभक्त आहेत आणि ते देशभक्तच राहतील, असे वक्तव्य केले होते.

'बापूंचा खून करणारा देशभक्त? हे राम!'

भाजपने प्रज्ञासिंह यांच्या मताशी सहमत नसल्याची भूमिका घेतली होती. भाजप प्रवक्ते नरसिंहा राव यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत प्रज्ञासिंह यांनी माफी मागावी, असे म्हटले होते. त्यानंतर पार्टीचा शब्द हा माझा शब्द आहे, असे सांगत प्रज्ञासिंह ठाकूर यांनी माफी मागितली.त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकानी प्रज्ञासिंह यांच्यासह भाजपवर निशाणा साधला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्याला देशभक्त म्हणणाऱ्या प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वक्तव्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी देखील मागी मागायला हवी, असे काँग्रेसने म्हटले आहे. 

जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख महबूबा मुफ्ती यांनी देखील प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता.  एका हिंदू कट्टरवाद्याने महात्मा गांधींची गोळ्या झाडून हत्या केली. त्याला देशभक्त म्हटले जात असेल तर मला देशद्रोही म्हटले जाते याचा अभिमान आहे असा राष्ट्रवाद आणि देशभक्ती आम्हाला जमणार नाही, अशा शब्दात संताप व्यक्त केला होता.  

अशा देशभक्तापेक्षा देशद्रोही म्हणून घेणं अभिमानाचं- मेहबुबा मुफ्ती
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Pragya Thakur refuses to apologise for Godse is patriot remark says party line is my line