पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'ते' विधान भोवलं, प्रज्ञा ठाकूर यांच्यावर भाजपाची कारवाई

प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर भाजपची कारवाई

भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर पक्षानं  कारवाई करत त्यांना दणका दिला आहे. नथुराम गोडसे देशभक्त असल्याचा पुनरुच्चार करणाऱ्या प्रज्ञा सिंह ठाकूर यांची संसदेच्या संरक्षणविषयक सल्लागार समितीवरून हकालपट्टी करण्यात आली आहे.  तसेच त्यांना संसदीय पक्षाच्या बैठकीत उपस्थित राहण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. 

अजित पवारांनी जाणीवपूर्वक फोन बंद ठेवलाय- राष्ट्रवादी

संसदेत डीएमके खासदार ए. राजा यांच्या भाषणादरम्यान त्यांनी महात्मा गांधींचे मारकेरी  नथुराम गोडसेंचा उल्लेख केला त्यावेळी प्रज्ञा ठाकूर यांनी त्यांना रोखत गोडसेंचा उल्लेख देशभक्त असा केला. यावरून मोठा वाद सुरू आहे. काँग्रेससह अनेक पक्षांनी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर कडाडून टिका केली तसेच पक्षाकडे ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली. 

'विरोधी पक्ष दिसत नसल्याचं म्हणणाऱ्यांवर आज विरोधात बसायची वेळ'

या वादानंतर भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रज्ञा ठाकूर यांना संरक्षणविषयक सल्लागार समितीवरून हकालपट्टी करण्याची शिफारस केली.  'साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचं ते विधान निंदनीय होतं. भाजप अशा प्रकारच्या वक्तव्यांचं किंवा विचारसरणीचं समर्थन करत नाही', असं जे. पी. नड्डा एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. तसेच प्रज्ञा सिंह ठाकूर यांना संसदीय पक्षाच्या बैठकीत उपस्थित राहण्यासही मज्जाव करण्यात आला असल्याचं ते म्हणाले. 

कितीही चौकशा करा आम्हाला काहीही फरक पडणार नाही'