पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रज्ञासिंह पंतप्रधान मोदींना आव्हान देत आहेतः ओवेसी

असदुद्दीन ओवेसी

भोपाळच्या भाजपच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी स्वच्छता गृहाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वादात सापडल्या आहेत. एमआयएमचे खासदार असुदुद्दीन ओवेसी यांनी प्रज्ञासिंह यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रज्ञासिंह यांनी आपल्या वक्तव्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानाला आव्हान दिल्याचा आरोप त्यांनी केला. 

१९४७ मध्येच हिस्सा दिला, भाजपचा ओवेसींवर पलटवार

प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्यावर ते म्हणाले की, प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्यामुळे मला आश्चर्याचा धक्का बसलेला नाही की त्यांच्या या वक्तव्यामुळे मी हैराण ही झालेलो नाही. ते त्यांचे विचार आहेत. त्यांना देशात होत असलेले जात आणि वर्गावर आधारित भेदभाव मान्य आहेत. दुर्दैवाने पंतप्रधानांच्या अभियानाचे त्यांनी जाहीररित्या विरोध केला आहे. 

दरम्यान, प्रज्ञासिंह यांनी जनतेने आम्हाला नाले, शौचालय साफ करण्यासाठी खासदार केले नसल्याचे म्हटले होते. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सीहोर येथील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 

प्रज्ञा यांच्या या वक्तव्यानंतर पंतप्रधान मोदी हेही नाराज झाले असल्याचे सांगण्याच येते. यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान प्रज्ञासिंह या गोडसे यांच्यावरील वक्तव्यामुळे चर्चेत आल्या होत्या. गोडसे देशभक्त होते, आहेत आणि ते देशभक्तच राहतील, असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर मोदींनी प्रज्ञासिंह यांनी मनापासून कधीच माफ करणार नाही, असे म्हटले होते.

प्रायश्चित घेण्यासाठी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे मौनव्रत