पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विमानात बसण्याच्या जागेवरून वाद झाल्यावर प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केला खुलासा

प्रज्ञासिंह ठाकूर

विमानात बसण्याच्या जागेवरून भोपाळच्या भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर आणि विमानातील सहप्रवासी आणि कर्मचारी यांच्यात शाब्दिक वाद झाल्यानंतर मंगळवारी त्यांनी या प्रकरणी खुलासा केला. प्रज्ञासिंह ठाकूर यांनी म्हटले आहे की, मी स्पाईसजेटच्या विमानातून प्रवास करीत होते. मला पाठीच्या कण्याचा आजार आहे. त्यामुळे मला विमानातील १ए जागा देण्यात आली होती. या सीटपुढे पाय पसरण्यासाठी पुरेशी जागा असते. त्यामुळेच मी ही जागा निवडली होती, असे त्यांनी म्हटले आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी याबद्दल खुलासा केला.

... मग CAA मध्ये मुस्लिमांचा समावेश का नाही?, भाजप नेत्याचा सवाल

विमानातील वादावादीचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. व्हिडिओतील दृश्य़ांवरून विमानातील सहप्रवासी आणि प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यात शाब्दिक वादावादी होत असल्याचे दिसते. प्रज्ञासिंह ठाकूर या स्पाईसजेटच्या विमानात आधीच एका प्रवाशाला दिलेल्या जागेवर बसल्या होत्या. त्यावरून वाद सुरू झाल्याची माहिती आहे. इतर काही प्रवासी प्रज्ञासिंह ठाकूर यांना त्यांचे वागणे योग्य नसल्याचे सांगतात. त्या जनतेच्या प्रतिनिधी आहेत. त्यांनी विमानातील प्रवाशांना त्रास देऊ नये. त्यांनी पुढच्या विमानाने यावे, असे काही प्रवासी त्यांना सांगत आहेत. पण प्रज्ञासिंह ठाकूर त्यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या.

मी विमानातील कर्मचाऱ्यांकडे नियम पुस्तिका दाखविण्याची मागणी केली. त्यांनी मला ही पुस्तिका दाखवली आणि मला योग्य वाटले तर मी स्वतःहून खाली उतरेन, असे प्रज्ञासिंह ठाकूर म्हणताना दिसतात. विमानात प्रथम श्रेणीच्या जागा नसल्याबद्दलही त्या तक्रार करताना दिसतात.

... तर झारखंडमधून एकही उमेदवार राज्यसभेत पाठविणे भाजपला शक्य नाही

प्रज्ञासिंह ठाकूर यांनी या प्रकरणी भोपाळमधील हवाई वाहतूक संचालकांकडे तक्रार केली आहे. विमानात मी जी जागा आरक्षित केली होती. ती मला देण्यात आली नाही. विमानातील कर्मचाऱ्यांचे वागणेही योग्य नव्हते, असे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.