पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रफुल्ल पटेल ED च्या कार्यालयात हजर, सोबत वकीलही उपस्थित

प्रफुल्ल पटेल

हवाई वाहतूक करारातील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल सोमवारी सकाळी सक्तवसुली संचालनालयाच्या ED कार्यालयात आपली साक्ष नोंदविण्यासाठी हजर झाले. त्यांच्यासोबत त्यांचे वकीलही यावेळी उपस्थित आहेत. एएनआयने हे ट्विट केले आहे.

सक्तवसुली संचालनालयाने दुसऱ्यांदा समन्स बजावून प्रफुल्ल पटेल यांना १० किंवा ११ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. यापूर्वी त्यांना ६ जून रोजी चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. परंतु, पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आपण चौकशीस हजर राहू शकत नसल्याचे सांगत प्रफुल्ल पटेल त्यावेळी गैरहजर राहिले होते.

शाळेचे आर्थिक, प्रशासकीय अधिकार हा मुख्याध्यापकांचा हक्क नाही - कोर्ट

आर्थिक स्थिती नसताना ७० हजार कोटी रुपये किंमतीच्या १११ विमानांची खरेदी, एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सचे विलीनीकरण, परकीय गुंतवणूकीतून प्रशिक्षण संस्था सुरु करणे तसेच आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग खासगी कंपन्यांना देणे याचा सक्तवसुली संचालनालयाकडून तपास सुरु आहे. त्या प्रकरणी साक्ष नोंदविण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांना समन्स बजावण्यात आले होते.