पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Whatsapp हेरगिरीची व्याप्ती मोठी, प्रफुल्ल पटेल यांचा मोबाईलही लक्ष्य

प्रफुल्ल पटेल

व्हॉटसऍपच्या माध्यमातून हेरगिरी करण्यात आल्याच्या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे समोर आले आहे. भारतातील काही राजकीय नेते, पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते आणि वकिलांच्या मोबाईलवरील व्हॉटसऍपची हेरगिरी करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. व्हॉटसऍपच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या मोबाईलवरील व्हॉटसऍप खात्याचीही हेरगिरी करण्यात आली आहे.

'भाजप-शिवसेनेच्या सत्तानाट्यामध्ये काँग्रेसने पडू नये'

लोकसभेचे माजी सदस्य आणि पत्रकार संतोष भारतीय यांच्याही मोबाईलवरील व्हॉटसऍपची हेरगिरी केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्यांच्या व्हॉटसऍपची हेरगिरी करण्यात आली, अशा भारतातील ४१ जणांची ओळख कंपनीने निश्चित केली आहे. या सर्व व्यक्तींना स्वतः व्हॉटसऍपकडून किंवा टोरांटोस्थित संशोधन संस्था सिटिझन लॅबकडून याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

हेरगिरी करण्यात आलेल्या व्यक्तींना व्हॉटसऍपकडून याबद्दल माहिती देण्यात आली. पण त्यापैकी अनेकांनी कंपनीने पाठविलेल्या संदेशांकडे फारसे गांभीर्याने बघितले नसल्याची शक्यता असल्याचे कंपनीने म्हटले आहे. प्रफुल्ल पटेल वापरत असलेल्या किमान एका मोबाईलवरील व्हॉटसऍपवर इस्राईलमधील सॉफ्टवेअरच्या साह्याने हेरगिरी करण्यात आल्याचे स्पष्ट आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

शिवसेनेने ठरवले तर बहुमत जमवू शकते, संजय राऊतांचा भाजपला इशारा

इस्रायली सॉफ्टवेअर पेगाससकडून जागतिक पातळीवर काही लोकांच्या व्हॉटसऍपची हेरगिरी करण्यात आली आहे, असे गुरुवारीच कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले.