पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली हिंसाचाराचा कट आधीपासून शिजला होता; भाजपचे काँग्रेस, आपला प्रत्युत्तर

प्रकाश जावडेकर

दिल्लीतील हिंसाचारावरून केंद्र सरकारवर आरोप करणाऱ्या काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला भाजपने गुरुवारी प्रत्युत्तर दिले. दिल्लीत जे काही घडले ते दोन दिवसांत झालेले नाही. खूप आधीपासून हा कट शिजत होता, असे सांगत चिथावणीखोर वक्तव्ये देण्यास कोणी सुरुवात केली, असा प्रश्न भाजपने उपस्थित केला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि आपवर टीका केली.

भीमा-कोरेगाव: ३४८ गुन्हे मागे, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना माफी नाही!

ते म्हणाले, दिल्लीत जे काही घडले ते दोन दिवसांत झालेले नाही. खूप आधीपासून हा कट शिजत होता. सुधारित नागरिकत्व कायदा अस्तित्त्वात आल्यानंतर रामलीला मैदानावर काँग्रेसने एक जाहीर सभा घेतली होती. त्यावेळी 'इस पार या उस पार' करण्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटले होते. मग हे विधान चिथावणीखोर नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

केंद्र आणि दिल्ली सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेतली - काँग्रेस

दिल्लीमध्ये बरेच काही घडले पण त्यातील काही मुद्द्यांबद्दल या दोन्ही पक्षांनी शांत राहणेच पसंद केले आहे, त्याकडेही प्रकाश जावडेकर यांनी लक्ष वेधले. आपचे नेते ताहिर हुसेन यांच्या घरातच दंगलीसाठी आवश्यक वस्तू होत्या. याचे व्हिडिओही प्रसारित झाले आहेत. त्यांच्या घरात दगडे, रसायने, ज्वलनशील वस्तू होत्या. याच वस्तूंचा वापर हिंसाचारासाठी करण्यात आला. पण हे दोन्ही पक्ष याबद्दल काहीच बोलायला तयार नाहीत, असे त्यांनी सांगितले.