पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सिद्धूजी राजकारण कधी सोडणार? पंजाबमध्ये पोस्टर्समधून विचारणा

नवज्योतसिंग सिद्धू

काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्या राजकीय सन्यासाच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. पंजाबमध्ये जागोजागी त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. सोशल मीडियावर सातत्याने त्यांना राजीनाम्याची आठवण करुन दिली जात आहे. लुधियाना, मोहाली येथे अशा प्रकारची मागणी करणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. 

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, पंजाबमधील मोहाली येथे नवज्योतसिंग सिद्धू यांचे छायाचित्र असलेले पोस्टर्स दिसत आहे. 'तुम्ही राजकारण कधी सोडत आहात ? वेळ आली आहे. तुम्ही तुमचा शब्द पाळा. आम्ही तुमच्या राजीनाम्याची वाट पाहत आहोत,' असे या पोस्टरवर लिहिले आहे. अशाच प्रकारचे पोस्टर्स लुधियाना येथेही लावण्यात आले आहेत.

नवज्योतसिंग सिद्धू यांनी राहुल गांधींची भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण

दरम्यान, भाजप उमेदवार स्मृती इराणी यांच्याकडून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठी मतदारसंघात राहुल गांधी यांचा पराभव झाला होता. तेव्हापासूनच सिद्धू यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. एप्रिलमध्ये सिद्धू यांनी राहुल गांधी यांचा अमेठीत पराभव झाल्यास राजकरण सोडण्याचे वचन दिले होते.

मला हटवून सिद्धूंना मुख्यमंत्री व्हायचं आहे- अमरिंदर सिंग