पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गेल्या तीन दिवसांतील कोर्टाच्या लढाईतील १० महत्त्वाच्या घडामोडी

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस

गेल्या शनिवारी सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला बुधवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जायचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी निकाल देताना विश्वासदर्शक ठरावाचे लाईव्ह प्रक्षेपण केले जावे, खुल्या पद्धतीने मतदान घेतले जावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

महाराष्ट्रातील १० ठळक घडामोडी

१. न्या. एन व्ही रमणा, न्या. अशोक भूषण आणि न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने मंगळवारी निकाल दिला. हंगामी अध्यक्षांच्या देखरेखीखाली विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेतले जावे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

'एक भगतसिंह देशासाठी फाशीवर गेले तर एकानं लोकशाहीची हत्या केली'

२. गुप्त पद्धतीने मतदान घेतले जाऊ नये. खुल्या पद्धतीने घेतले जावे. त्याचे लाईव्ह टेलिकास्ट केले जावे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

३. भाजपकडे बहुमताचा आकडा नाही. त्यामुळे फडणवीस सरकारला लवकरात लवकर विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्यास सांगावे, असा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा दावा होता.

४. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सध्या मुंबईत विविध हॉटेल्समध्ये आहेत. आमच्याकडे १६२ आमदारांचे संख्याबळ आहे, असा दावा विरोधकांनी केला आहे.

५. भाजपला कोणत्याही स्थितीत रोखण्याचा निश्चय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. आतापर्यंत तुम्ही शिवसेनेचे सहकार्य बघितले आता विरोधही बघाल, असे त्यांनी म्हटले आहे.

६. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आमचा पक्ष विश्वास प्रस्ताव नक्की जिंकेल, असे म्हटले आहे.

७. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १७० आमदारांचे पाठबळ असल्याचे पत्र राज्यपालांना मिळाल्यावर राज्यपाल कार्यालयाने त्याचा तपास करण्याचे काहीही कारण नसल्याचे सर्वोच्च न्यायालयातील युक्तिवादात सांगितले होते.

८. रविवारी झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करताना सादर करण्यात आलेली पत्रे मागवून घेतली होती. सोमवारी एकूण तीन पत्रे सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

फडणवीसांनी आजच राजीनामा दिला पाहिजे, विरोधकांची मागणी

९. अधिवक्ता तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात ही पत्रे सादर केली. अजित पवारांकडून सादर झालेल्या पाठिंब्याच्या पत्रावर ५४ आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

१०. याचिकाकर्त्यांचे वकील कपिल सिब्बल यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या १५४ आमदारांच्या स्वाक्षऱ्या होत्या.