पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO: मोहरमची मिरवणूक पाहताना बंगल्याची गच्ची कोसळली; २० जण जखमी

बंगल्याची गच्ची कोसळली

आंध्रप्रदेशमध्ये मोहरम दरम्यान मोठी दुर्घटना घडली. बंगल्याची गच्ची कोसळून २० जण जखमी झाले आहेत. यामधील ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. आंध्रप्रदेशच्या कर्नूल जिल्ह्यातील बी तांड्रापाडू गावामध्ये ही घटना घडली आहे. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पक्षांतर्गत वादाचा बळी; उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेसचा राजीनामा

मोहरमनिमित्त बी तांड्रापाडू गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक पाहण्यासाठी एका बंगल्याच्या गच्चीवर अनेक जण उभे होते. त्यासोबत रस्त्यावर देखील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होती. अशामध्येच अचानक बंगल्याची गच्ची कोसळली. या दुर्घटनेमध्ये २० जण जखमी झाले. त्यांना ताबडतोब नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले. यामधील ५ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. 

तयारी विधानसभेची!, शरद पवारांनी घेतली सोनिया गांधींची भेट