पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकच्या माजी राजनैतिक अधिकाऱ्याचे पॉर्नस्टारने उघडले डोळे

पाकच्या माजी राजनैतिक अधिकाऱ्याचे पॉर्नस्टारने उघडले डोळे

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानच्या नेत्यांचा तीळपापड होताना दिसत आहे. भारतातील पाकिस्तानचे राजदूत राहिलेले अब्दुल बासित यांनी पॉर्नस्टार जॉनी सिन्सचा एक फोटो टि्वटरवर शेअर करत तो भारतीय लष्कराच्या मारहाणीचा बळी ठरलेला काश्मिरी युवक असल्याचे म्हटले होते. बासित यांनी जॉनी सिन्सला अनंतनागमधील युसूफ असल्याचे म्हटले होते. जगभरातून ट्रोल होत असलेल्या बासित यांना जॉनी सिन्सनेही उत्तर दिले आहे.

जॉनी सिन्सच्या टि्वटने बासित यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. जॉनीने आपल्या टि्वटमध्ये म्हटले की, तुमच्यामुळे माझ्या फॉलोअर्सच्या संख्येत वाढ झाली आहे. यासाठी मी तुमचे आभार मानतो. बासित यांनी सिन्सचे एक छायाचित्र शेअर करत पेलेट गनमुळे जखमी झालेला युवक असल्याचे म्हटले होते. सिन्सने बासित यांची मजा घेत म्हटले की, माझी दृष्टी व्यवस्थित आहे. जगभरात मला प्रसिद्धी दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो.

लंडनमध्ये पाकिस्तानी समर्थकांचे आंदोलन; भारतीय उच्चायुक्त कार्यालयावर दगडफेक

अब्दुल बासित हे यापूर्वीही आपल्या वक्तव्यामुळे वादात अडकले होते. भारतातील प्रख्यात लेखिका शोभा डे यांना मुद्दामहून एका प्रकरणात पाकिस्तानच्या समर्थनार्थ लेख लिहिण्यास सांगितले होते, असे त्यांनी म्हटले होते. परंतु, शोभा डे यांनी त्वरीत त्यांचा हा दावा फेटाळता आपली बासित यांच्याशी फक्त एकदा आणि तीही ओझरती भेट झाल्याचे म्हटले होते.

राहण्यायोग्य शहरांच्या यादीत दिल्ली, मुंबईची घसरण

यापूर्वीही अनेक पाकिस्तानी मंत्री टि्वटरवर चुकीचा प्रचार केल्यामुळे ट्रोल झालेले आहेत. पाकिस्तानी मंत्री फवाद चौधरी असो किंवा त्यांचे माजी गृहमंत्री रहमान मलिक हे सर्वजण टि्वटरवर चेष्टेचा विषय ठरले होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Porn star Johnny Sins mocks ex Pak envoy Abdul Basit confirms his vision is fine kashmir issue