पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Lok Sabha election 2019 Exit Poll: बहुतांश एक्झिट पोलनुसार देशात पुन्हा 'नमो-नमो'

पंतप्रधान नरेंद्र मोदी

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान रविवारी ६ वाजता संपले. त्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज येण्यास सुरुवात झाली. विविध संस्थांनी केलेल्या सर्व्हेनुसार भाजप सरकार सत्तेवर येण्याचा अंदाज आहे. सीएनएन आणि आयपीएसओएसने केलेल्या सर्व्हेनुसार एनडीएला ३३६, यूपीएला ८२ आणि इतरांना १२४ जागा मिळण्याची शक्यता आहे. एबीपी आणि नेल्सनच्या सर्व्हेनुसार एनडीए २६७, यूपीए १२७ आणि इतरांना १४८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. 

Maharashtra Exit Poll : राज्यात पुन्हा एकदा युतीच वरचढ ठरण्याचा अंदाज

रिपब्लिक टीव्ही-सी व्होटरच्या सर्व्हेनुसार एनडीए २८७, यूपीए १२८, महाआघाडी ४० आणि इतरांना ८७ जागा मिळण्याची शक्यता आहे. रिपब्लिक जन की बातनुसार भाजप ३०५ हून अधिक, यूपीएला १२४ आणि इतरांना ११३ जागा मिळू शकतात. 

टाइम्स नाउच्या सर्व्हेत एनडीएला ३०६, यूपीएला १४२ तर इतरांना ९४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. न्यूज नेशननुसार एनडीएला २८२-२९०, यूपीएला ११८ ते १२६ आणि इतरांना १३० ते १३८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. 

उत्तर प्रदेशात महाआघाडीमुळे भाजपचे नुकसान होण्याचा अंदाज, जागांसाठी जोरदार टक्कर

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पूर्ण बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने पुन्हा सत्तेत येण्यासाठी जोर लावला आहे. तर गतवेळी ४४ जागांवर संपुष्टात आलेल्या काँग्रेसलाही पुनरागमनाची अपेक्षा आहे. निवडणूक निकाल येण्याआधी पुन्हा एकदा बिगर एनडीए सरकार आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, बसपा सुप्रिमो मायावती आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. 

मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने ६ राज्यांमध्ये विरोधकांना धूळ चारली होती. यावेळी भाजप मागील वेळचा करिष्मा पुन्हा करु शकते का हे पाहावे लागेल. २०१४ मध्ये भाजपला अँटी इन्कबन्सीचा फायदा मिळाला होता. पण मागील ५ वर्षांत परिस्थिती बदलली असून राजकीय समीकरणेही बदलले आहेत. अनेक राज्यांमध्ये भाजपचे सरकार गेले आहे. 

सयामी जुळ्या बहिणींनी पहिल्यांदाच केले वेगवेगळे मतदान

२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजप प्रचंड बहुमताने सत्तेत आली होती. २०१४ मध्ये एकूण ५४३ जागांवर झालेल्या निवडणुकीत भाजपने २८२ जागा जिंकत स्पष्ट बहुमत प्राप्त केले होते. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला ३३६ जागा मिळाल्या होत्या. तर यूपीएला ६० जागा मिळाल्या होत्या. भाजपने ४२८ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. तर काँग्रेसने ४६४ जागांवर उमेदवार उतरवले होते. त्यांना अवघ्या ४४ जागांवरच समाधान मानावे लागले होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:poll of pools exit poll 2019 loksabha election opinion poll bjp and congress vote share prediction seat by seat