पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अरुण जेटली यांचा राजकीय प्रवास

अरूण जेटली

देशाचे अर्थमंत्री पद सांभाळलेले अरुण जेटली यांची गणती भाजपच्या दिग्गज नेत्यांमध्ये केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या सरकारमध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली. मोदींनी नेहमी त्यांचे कौतुक केले  आहे. आतापर्यंत अरुण जेटली यांनी आमदार, मंत्री, मुख्यमंत्री त्यानंतर राज्यसभेवर खासदार, विरोधी पक्षनेते पद भूषवले आहेत. अरुण जेटली यांचा राजकीय प्रवास खूप मोठा होता त्यावर एक नजर टाकूया. 

- अरुण जेटली यांच्या राजकीय कारकीर्दीला महाविद्यालयापासून झाली. १९७४ मध्ये अरुण जेटली हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते होते.

- १९७७ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली होती.

- १९९१ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य म्हणून निवड झाली. 

-  १९९८ ला अरुण जेटली यांची निवड संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेला जाणाऱ्या शिष्टमंडळात झाली होती.

- १९९९ च्या निवडणुकीआधी त्यांची निवड भाजपचे प्रवक्ते पदी झाली. 

- १३ ऑक्टोबर १९९९ रोजी जेटलींची नियुक्ती अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात करण्यात आली होती.

- वाजयपेयी यांच्या मंत्रीमंडळात त्यांच्याकडे तंत्रज्ञान आणि प्रसारण या मंत्रालयाचा पदभार सोपवण्यात आला होता. 

-  २३ जुलै २००० मध्ये राम जेठमलानी यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी कायदा व न्याय मंत्रालयाचा अतिरिक्त पदभार संभाळला.

- २९ जानेवारी २००३ रोजी केंद्रीय वाणिज्य व उद्योग व कायदा व न्यायमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.

- २००९ ते २०१४ या काळात त्यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून काम केले. 

- २६ मे २०१४ रोजी ते नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आहे. 

-  मोदी सरकार १ मध्ये त्यांची अर्थमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली होती. देशात आर्थिक सुधारणा होण्यासाठी त्यांनी अनेक  महत्वपूर्ण निर्णय घेतले. 

- अर्थमंत्री पदी असताना त्यांनी भ्रष्टाचार, काळा पैसा, बनावट नोटा आणि दहशतवाद रोखण्यासाठी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. 

- २०१९ मध्ये आजारी असल्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली नाही.