पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली हिंसाचाराच्या तपासासाठी दोन एसआयटीची स्थापना

दिल्ली हिंसाचार

दिल्लीतील हिंसाचार प्रकरणाच्या तपासासाठी गुरुवारी संध्याकाळी एक विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटी तयार करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेअंतर्गत दोन एसआयटीची स्थापन करण्यात आली आहे. याचे नेतृत्व डीसीपी जॉय टिर्की आणि डीसीपी राजेश देव करणार आहेत. याशिवाय दिल्ली हिंसाचार प्रकरणी दाखल केलेल्या सर्व एफआयआर एसआयटीकडे वर्ग करण्यात आल्या आहेत.

आता जयसिद्धेश्वर महास्वामी म्हणाले, प्रवासादरम्यान जातीचा दाखला हरवला

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दिल्लीत करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान हिंसाचार झाला. या हिंसाचारामध्ये आतापर्यंत ३७ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. बुधवारी मृतांची संख्या २७ होती. यामधील २५ जणांचा मृत्यू जीटीबी रुग्णालयात झाला आहे. या हिंसाचारामध्ये २५० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर दिल्लीतील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

'आप'चा सदस्य दोषी आढळल्यास त्याला दुप्पट शिक्षा करा

दरम्यान, दिल्ली हिंसाचारा दरम्यान मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना केजरीवाल सरकारने १० लाखांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे.  मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख, अल्पवयीनचा मृत्यू झाला असेल तर ५ लाख आणि एखाद्याचे घर, दुकान जळून खाक झाले असल्यास त्यांना ५ लाख, रिक्षा जळाल्यास किंवा खराब झाल्यास २५ हजारांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

दिल्ली हिंसाचार: मृतांच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत जाहीर