पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली हिंसाचार : १०६ जणांना अटक, १८ जणांवर गुन्हे दाखल

दिल्ली पोलिसांनी अनेकांना अटक केली .

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात भडकलेल्या हिंसाचाराच्या प्रकणात १०६ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत दिल्ली पोलिसांनी १८ जणांवर गुन्हे दाखल केले आहे. दिल्ली गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मंदीप सिंह रंधावा यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. दिल्लीमध्ये ज्या भागात लोक अडचणीत सापडले आहेत त्यांच्यासाठी दिल्ली पोलिसांनी हेल्पलाईन सेवा सुरु केल्याची माहितीही त्यांनी दिली. हिंसाचारात अडकल्यास 011-22829334, 22829335 या दोन क्रमांकावर मदत मागण्यासाठी कॉल करण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

दिल्ली हिंसाचार : अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

मंदीप सिंह रंधावा म्हणाले की, बुधवारी दिल्लीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. इशान्य दिल्ली परिसरातून येणारे पीसीआर कॉलही कमी झाले आहेत. सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणारा गट आणि या कायद्याचे समर्थनार्थ रस्त्यावर आलेल्या गटामध्ये झालेल्या दगडफेकीच्या प्रकारानंतर आंदोलन भडकले होते. दिल्लीच्या ईशान्य भागात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हिंसाचारात २२ लोकांनी जीव गमावला असून अनेक जण जखमी झाले आहेत.  

कोरोनाच्या विळख्यातील महाराष्ट्रयीन लष्कराच्या विमानातून दिल्लीत येणार

शाहिन बागमध्ये दोन महिन्याहून अधिक काळ शांततेत सुरु असलेल्या आंदोलनानंतर जाफराबादमध्ये गालबोट लागले. याठिकाणी दोन गटात दगडफेकीचा प्रकार मागील शनिवारी घडला. त्यानंतर रविवार आंदोलनाने हिंसक वळण घेतले. यात आतापर्यंत २२ जणांनी आपला जीव गमावला. तर २०० हून अधिक लोक जखमी असल्याचे समोर येत आहे. जखमींमध्ये ५० हून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेशही आहे. सलग तीन दिवस ईशान्य भागातील आंदोलनात हिंसक घटना घडल्या. परिणामी याठिकाणी जमाव बंदा लागू करण्यात आली आहे.