पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जेएनयू हल्ला : विद्यार्थ्यांवरील काही हल्लेखोरांची ओळख पटली- सूत्र

जेएनयू हल्ला

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर करण्यात आलेल्या हल्लेखोरांची ओळख पोलिसांना  पटली  आहे. रविवारी रात्री चेहरा 
झाकलेल्या हल्लेखोरांचं टोळकं जेएनयूच्या  कॅम्पसमध्ये शिरलं त्यांनी विद्यार्थी तसेच प्राध्यापकांना जबर मारहाण केली. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले तर  महाविद्यालयाच्या मालमत्तेचंही मोठं नुकसान झालं. या हल्ल्यात दोषी  असलेल्या कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, मात्र काही हल्लेखोरांची ओळख पटवण्यात दिल्ली पोलिसांना यश आल्याचं समजत आहे. 

दिल्ली : प्रिंटिंग प्रेसला भीषण आग, एकाचा मृत्यू

दिल्ली क्राइम ब्रांचचं एक पथक या हल्ल्याची चौकशी करत आहे. या  हल्ल्याचा देशभरातून तीव्र निषेध होत आहे. रविवारी झालेल्या हल्ल्यानंतर देशभरात संतप्त लाट उसळली. ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी निदर्शनंदेखील केली. या हल्ल्यात ३० हून अधिक विद्यार्थी आणि प्राध्यपक जखमी झाले होते. या हल्ल्यातील काही महत्त्वाचे धागेदोरे सापडले असून लवकरच यामागच्या सुत्रधारांचा उलगडा होईल असंही पोलिसांनी सांगितलं.

बगदादमधील ग्रीन झोनमध्ये अमेरिकेच्या दूतावासाजवळ क्षेपणास्त्र हल्ला

दरम्यान जेएनयुमधील डावी विद्यार्थी संघटना आणि अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेनं एकमेकांना हल्ल्यासाठी दोषी धरलं आहे. दरम्यान हिंदू रक्षक दलानं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या दलाचा नेता पिंकी चौधरीनं ट्विटवर एका व्हिडिओ  शेअर केला आहे. पोलिस या हल्ल्यात हिंदू रक्षक दलाचा हात होता का याचीदेखील चौकशी करत आहेत.