पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CAA आंदोलनावेळी अपप्रचार केल्यावरून PFI चा सदस्य अटकेत

मोहम्मद दानिश (फोटो - एएनआय)

दिल्लीमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनावेळी अपप्रचार केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या एका सदस्याला अटक केली. एएनआयने या संदर्भातील वृत्त दिले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने या प्रकरणी मोहम्मद दानिश याला अटक केली. आंदोलनावेळी कायद्याबद्दल दिशाभूल करणारी माहिती पसरवून अपप्रचार केल्याचा दानिशवर आरोप आहे.

कोरोनामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका, ५ लाख कोटी बुडाले!

दानिश हा मूळचा पूर्व दिल्लीतील त्रिलोकपुरीतील रहिवासी आहे. गेल्यावर्षी संसदेने सुधारित नागरिकत्व विधेयक मंजूर केल्यावर त्याचे कायद्यात रुपांतर झाले. यानंतर दिल्लीमध्ये काही संघटनांनी या कायद्याविरोधात जोरदार निदर्शने केली. डिसेंबरमध्ये दिल्लीमध्ये मोठी निदर्शने झाली. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी या कायद्याविरोधात काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले होते. १५ डिसेंबर २०१९ रोजी निघालेल्या या मोर्चामध्ये आंदोलकांनी काही गाड्यांची तोडफोड केली तर काही गाड्यांना आग लावली.

कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण कर्नाटकात हॉस्पिटलमधून पळाला

गेल्या महिन्यातच दिल्लीतील सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात झालेल्या आंदोलनांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा हात असल्याचे सक्तवसुली संचालनालयाने म्हटले होते. दिल्लीसह उत्तर प्रदेशमध्येही या कायद्याविरोधात जोरदार निदर्शने झाली होती. गेल्या तीन महिन्यांपासून सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आंदोलन केली जात आहेत.