पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कुमार विश्वास यांच्या एसयूव्हीची घराबाहेरुन चोरी

कुमार विश्वास

प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास यांची कार त्यांच्या घराबाहेरुन चोरी झाली आहे. कुमार विश्वास हे गाझियाबादमधील वसुंधरा येथे राहतात. त्यांनी आपली फॉर्च्युनर एसयूव्ही घराबाहेर उभी केली होती. पोलिसांनी या प्रकाराचा तपास सुरु केला आहे. 

वादग्रस्त वक्तव्य, गिरिराज सिंह यांना जेपी नड्डांनी बोलावणे धाडले

शुक्रवारी रात्री कुमार विश्वास यांनी आपली कार घराबाहेर उभा केली होती. शनिवारी सकाळी त्यांना आपली कार चोरीला गेल्याचे लक्षात आले. कारचा शोध लावला जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. कुमार विश्वास यांच्या काळ्या रंगाच्या कारची शुक्रवारी रात्री उशिरा सुमारे दीडच्या सुमारास चोरी झाल्याचे सांगितले जात आहे.

फोन टॅपिंगच्या चौकशीवरूनही शिवसेना आणि राष्ट्रवादीत दुमत

कारच्या शोधासाठी पोलिसांनी काही पथके तैनात केले आहेत. सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कुमार विश्वास हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध हिंदी कवी आहेत. 

विवाहबाह्य संबंधांतून पाच मुलांच्या आईने केली नवऱ्याची हत्या

अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर कुमार विश्वास हे आम आदमी पक्षात सहभागी झाले होते. ते आपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. परंतु, नंतर अरविंद केजरीवाल यांच्याशी मतभेद झाल्यानतर त्यांनी आपचा त्याग केला होता. ते सोशल मीडियावर वारंवार केजरीवाल यांच्यावर टीका करत असतात.