पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पीएमसी बँक घोटाळा: खातेधारकांना हायकोर्टात जाण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश

पीएमसी बँक घाटाळा प्रकरणी आणखी एकाला अटक

पीएमसी बँकेवर आरबीआयने लादलेल्या निर्बंधामुळे खातेधारकांचे पैसे अडकले आहेत. त्यामुळे चिंतेत आलेल्या खातेधारकांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये त्यांनि आरबीआयने लावलेले निर्बंध हटवण्यात यावे अशी मागणी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने या याचिकेविरोधात सुनावणी करण्यास नकार दिला. या खातेधारकांना मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणयाचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहे.

निवडणुकीवर बहिष्कार टाका; नक्षलवाद्यांनी झळकावले बॅनर्स

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले की, 'आम्ही कलम ३२ अंतर्गत या याचिकेवर सुनावणी करु इच्छित नाही. याचिकाकर्ते याप्रकरणी संबंधित हायकोर्टाकडे जाऊ शकतात.' पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी संतप्त झालेले खातेधारक आंदोलन करत आहेत. अशातच सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी बँकेशी संबंधित एका याचिकेवर सुनावणी करण्याचे मान्य केले.

मेक्सिकोतून ३११ भारतीयांना बेकायदा प्रवेशावरून मायदेशी परत

दरम्यान, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, 'सरकारला या परिस्थितीची पूर्ण माहिती आहे आणि अंमलबजावणी संचालनालय दोषींवर योग्य ती कारवाई करत आहे.' दरम्यान, दिल्लीतील बिजोन कुमार मिश्रा यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केले आहे. या याचिकेमध्ये त्यांनी खातेधारक आणि ठेवीधारकांना कराव्या लागणाऱ्या अडचणींचा उल्लेख केला आहे. 

सरन्यायाधीशपदासाठी न्या. शरद बोबडे यांच्या नावाची शिफारस