पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'त्या' महिलांना मिळणार मोदींच्या सोशल मीडिया हँडलवर झळकण्याची संधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

सोशल मीडियावर सक्रीय असणारे आणि ट्विटरवर देशातील सर्वाधिक फॉलो केले जाणारे व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रात्री  ट्विटरच्या माध्यमातून सोशल मीडियाला रामराम ठोकण्याचे संकेत दिले. त्यामुळे सारेच जण कोड्यात पडले मात्र त्या ट्विटमागचं नेमकं कोडं  पंतप्रधानांनी उलगडलं आहे. 

BLOG : 'सोशल मीडियामुक्त भारत' मोहिमेत कोण कोण सामील होणार?

येत्या रविवारी अर्थात ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन आहे. यानिमित्तानं एका प्रेरणादायी महिलेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोशल मीडिया हँडलवर झळकण्याची संधी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच ट्विटरच्या माध्यमातून याची घोषणा केली आहे.  पंतप्रधानांकडून सुरु करण्यात आलेल्या SheInspiresUs नव्या उपक्रमाद्वारे आयुष्याला प्रेरणा देणाऱ्या महिलांचा गौरव यानिमित्तानं केला जाणार आहे. त्यांचे विचार मोदींच्या सोशल मीडिया हँडलमार्फत जगभरात पोहोचणार आहेत. 

संसदेच्या प्रवेशद्वारावर भाजप खासदाराची गाडी बूम बॅरिअरला धडकली आणि...

या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केली आहे. मोदींचे ट्विटर तब्बल ५३.३ दशलक्ष फॉलोवर्स आहेत. तर फेसबुकवर त्यांना ४ कोटी ४७ लोक फॉलो करत आहेत. इन्स्टाग्रावरही त्यांच्या फॉलोवर्सचा आकडा हा ३५. २ दशलक्षच्या घरात आहे. या विविध सोशल मीडिया व्यासपीठाद्वारे ही प्रेरणादायी महिला आपल्या विचारांनी, कार्यानं जगभरातील लोकांना प्रेरित करणार आहे. 

रविवारी फेसबुक, ट्विटर, इन्टाग्राम आणि यू-ट्युब सोडण्याचा विचार करत आहे .यासंदर्भातील भूमिका लवकरच स्पष्ट करेन, असं ट्विट मोदींनी सोमवारी रात्री केलं होतं. त्यामुळे मोदींनी आपला निर्णय जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला. यामागची मोदींची नेमकी भूमिका काय हे जाणून घेण्याचं कुतूहल सर्वांना होतं, अखेर  मोदींनी आपल्या ट्विटमागची भूमिका स्पष्ट केली आहे.