पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंतप्रधानांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रांना सोडायंचंय PMO

नृपेंद्र मिश्रा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा निवृत्त होत आहेत. त्यांनी स्वतःच कामातून मुक्त करण्याची विनंती केली होती. त्यांची विनंती पंतप्रधान मोदी यांनी मान्य केली आहे. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांनी माजी कॅबिनेट सचिव पी.के.सिन्हा यांना पीएमओमध्ये ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी नियुक्त केले आहे. मिश्रा यांच्या कार्य मुक्तीला दुजोरा स्वतः पतंप्रधान मोदी यांनी टि्वटरवर दिला आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात ते जबाबदारीतून मुक्त होतील, असे त्यांनी सांगितले आहे. 

मोदींनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले की, २०१९ च्या निवडणुकीनंतर नृपेंद्र मिश्रा यांनी स्वतःहून प्रधान सचिव पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती. तेव्ही मी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पदावर राहण्याची विनंती केली होती. 

ते पुढे म्हणाले की, २०१४ मध्ये जेव्हा मी पंतप्रधान म्हणून जबाबदारी स्वीकारली. तेव्हा दिल्ली माझ्यासाठी नवीन होती. नृपेंद्र मिश्रा हेही नवे होते. पण दिल्लीच्या शासन-व्यवस्थेशी ते परिचित होते. या परिस्थितीत त्यांनी प्रधान सचिव म्हणून बहुमूल्य योगदान दिले आहे.

जेव्हा मी दिल्लीला आलो तेव्हा मला नृपेंद्र मिश्रांची खूप मदत झाली. त्यांनी त्यावेळी फक्त वैयक्तिक रुपाने माझी मदत केली नाही तर ५ वर्षे देशाला पुढे नेण्यात, जनतेचा विश्वास जिंकण्यात महत्वाची भूमिका निभावली.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:PM principal secretary wants to leave PMO former cabinet secretary PK Sinha appointed OSD in PMO