पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रशिया दौऱ्यातील मोदींच्या 'या' व्हायरल व्हिडीओचे होतेय कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी

रशिया दौऱ्या दरम्यानचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओचे खूप कौतुक होत असून त्याला खूप लाईक्स मिळत आहे. रशिया दौऱ्या दरम्यान नरेंद्र मोदी यांनी फोटो काढण्यासाठी लावलेल्या सोफ्यावर बसण्यास नकार देत सर्वांसोबत खुर्चीवर बसून फोटो काढण्याचा निर्णय घेतला. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

चांद्रयान २ साठी महत्त्वाचा क्षण, विक्रम लँडर शनिवारी चंद्रावर उतरणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर होते. या दौऱ्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत फोटो काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी सोफा ठेवला होता. तर अन्य अधिकाऱ्यांना बसण्यासाठी सोफ्याच्या बाजूला काही खुर्च्या लावण्यात आल्या होत्या. मोदी त्याठिकाणी दाखल होताच त्यांचे लक्ष फोटो काढण्यासाठी केलेल्या व्यवस्थेकडे गेले. त्यांनी लगेच त्याठिकाणी उपस्थित अधिकाऱ्यांना सोफा हटवण्यास सांगत आणखी एक खुर्ची लावण्यास सांगितली. त्यानंतर मोदींनी या खुर्चीवर बसून सर्वांसोबत फोटो काढले. 

ज्येष्ठ साहित्यिक किरण नगरकर यांचे निधन

मोदींच्या या व्हिडीओला केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी शेअर करत मोदींचे खूप कौतुक केले आहे. पीयूष गोयल यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. ' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साधेपणाचे आणखी एक उदाहरण आज पहायला मिळाले. त्यांनी रशियामध्ये स्वत: साठी केलेली खास व्यवस्था काढून टाकली आणि इतरांसोबत खुर्चीवर बसण्याची इच्छा व्यक्त केली.' असल्याचे सांगत पीयूष गोयल यांनी मोदींचे कौतुक केले आहे.

हर्षवर्धन पाटलांच्या आरोपांमुळे धक्काः सुप्रिया सुळे