पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... असे असणार राष्ट्रपती, पंतप्रधानांचे नवे 'एअर फोर्स वन' विमान, काही खास सुविधा

पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशातील तीन महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींच्या म्हणजेच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या परदेश दौऱ्यासाठी विकत घेण्यात आलेली दोन बोईंग विमाने पुढील वर्षी जूनमध्ये भारतात दाखल होताहेत. विशेष म्हणजे ही विमाने यापुढे एअर इंडियाच्या नव्हे तर भारतीय हवाई दलाच्या ताब्यात असणार आहेत. साऊथ ब्लॉकमधील उच्चपदस्थ सूत्रांनी याला दुजारो दिला आहे. या संदर्भात उच्चस्तरावर चर्चा सुरू झाली असून, अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे या सूत्रांनी सांगितले.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट, महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ

बोईंग ७७७-३०० ईआर जातीची ही दोन विमाने असणार असून, त्यामध्ये क्षेपणास्त्रविरोधी प्रणाली बसविण्यात आली आहे. सध्या अमेरिकेत बोईंगच्या विमान निर्मिती कारखान्यात या विमानांच्या निर्मितीवर काम करण्यात येत आहे. एअर फोर्स वन नावाने ही विमाने ओळखली जातील. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे बोईंग ७४७-२००बी हे विमान असून, ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे. 

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या दौऱ्यांसाठीच ही नवीन विमाने वापरली जातील. वेगवेगळ्या निमित्ताने हे तिन्ही मान्यवर परदेश दौऱ्यावर जात असतात. सध्या त्यांच्या परदेश दौऱ्यांसाठी एअर इंडियाकडून विमान उपलब्ध करून दिले जाते. तर देशांतर्गत लहान अंतराच्या दौऱ्यांसाठी हवाई दलाच्या व्हीव्हीआयपींसाठी राखीव ताफ्यातून विमान उपलब्ध करून दिले जाते. 

बोईंग ७७७ जातीतील विमानामध्ये क्षेणणास्त्रविरोधी प्रणाली बसविण्यात येणार असल्याचे हे पहिलेच उदाहरण आहे. हे विमान गरजेनुसार शत्रूच्या रडारच्या फ्रिक्वेन्सीपासून दूर राहू शकते. क्षेपणास्त्राचा भेद करण्याचीसुद्धा या विमानामध्ये ताकद असणार आहे. 

जागतिक आर्थिक मंदीचा भारतावरही परिणामः आयएमएफ प्रमुख

क्षेपणास्त्रविरोधी प्रणाली बसविण्यात आल्यामुळेच हे विमान भारतीय हवाई दलाच्या ताब्यात असणार आहे. एअर इंडियातील निर्गुंतवणुकीचा पुढील निर्णय केंद्र सरकारकडून लवकरच घेतला जाणार आहे. त्याचीही या निर्णयाला पार्श्वभूमी आहे. 

सध्या पंतप्रधानांच्या विमानाला एअर इंडिया वन असे संबोधले जाते. जर नवे विमान भारतीय हवाई दलाच्या ताब्यात गेले तर त्याला एअर फोर्स वन असे संबोधले जाईल, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.