पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना विषाणूचा परिणाम, मोदींचा बांगलादेश दौरा रद्द

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

चीनमधून जगभरात पसरलेल्या घातक कोरोना विषाणूमुळे अनेक नियोजित कार्यक्रम रद्द केले जात आहेत. याच मालिकेत आता बांगलादेशने शेख मुजीबुर उर रहमान यांचा जयंती शताब्दी सोहळा रद्द केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या समारोहात प्रमुख वक्ता होते. आता त्यांचा बांगलादेश दौराच रद्द झाला आहे. 

या आठवड्यात बांगलादेश संसदेच्या अध्यक्षा शिरीन शरमिन चौधरी यांनीही त्यांचा भारत दौरा रद्द केला आहे. त्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निमंत्रणावरुन १८ सदस्यीय प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व करणार होत्या.

कच्च्या तेलाचे दर ३० टक्क्यांने कोसळले, १९९१ नंतरची सर्वात मोठी घसरण

पंतप्रधान मोदी १७ मार्च रोजी बांगलादेशला जाणार होते. परंतु, कोरोना विषाणूमुळे त्यांना हा दौरा रद्द करावा लागला होता. उत्सव समितीचे अध्यक्ष कमाल अब्दुल चौधरी यांनी बांगलादेश सरकारचा हा कार्यक्रम रद्द करण्याच्या निर्णयाची माहिती दिली. रविवारी बांगलादेशमध्ये कोरोना विषाणूचे ३ रुग्ण आढळून आले. हे तीनही रुग्ण इटलीतून परतले होते. 

याबाबत चौधरी यांनी म्हटले की, आम्ही हा कार्यक्रम पुन्हा आखला आहे. हा वर्षभर चालणारा कार्यक्रम असेल. परंतु, सध्या नागरिकांची गर्दी आम्हाला टाळायची आहे. वर्षभर आम्ही कार्यक्रम करु आणि परदेशातून येणारे दिग्गज व्यक्ती यात सहभागी होऊ शकतात. 

कोरोनामुळे इटलीत एकाच दिवशी १३३ जणांचा मृत्यू

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान मोदींना बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या शताब्दी समारोहात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते. मुजीबुर रहमान यांना 'फादर ऑफ बांगलादेश' म्हटले जाते.

पंतप्रधान मोदी हे ब्रुसेल्स येथे आयोजित यूरोपियन यूनियनच्या संमेलनात सहभागी होणार होते. परंतु, कोरोना विषाणूमुळे त्यांचा हा दौरा रद्द करावा लागला.

जागतिक महिला दिनी राज्याच्या गृहमंत्र्यांनी महिलांना दिली खूशखबर