पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शुभेच्छा

नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे

राज्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. उद्धव ठाकरे हे राज्याचे २९ वे मुख्यमंत्री झाले आहेत. नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्रात ठाकरे सरकार, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 'उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मला विश्वास आहे की ते महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी परिश्रमपूर्वक काम करतील.' तसंच, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सगळ्या सदस्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

शपथविधीसाठी शिवतिर्थावर दिग्गजांची उपस्थिती

शिवतिर्थावर शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्या दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, शपथविधी सोहळ्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती. 

PHOTOS: शपथविधी सोहळ्यासाठी शिवतिर्थ सज्ज