पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO: मोदींनी जिंकलं मन, प्रोटोकॉल तोडून केलं 'हे' काम

प्रोटोकॉल तोडून PM मोदींनी केले 'हे' काम, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का (ANI)

स्वच्छतेप्रती देशात जागरुकता निर्माण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेत पोहोचल्यानंतर आपल्या एका छोट्या कृतीतून संदेश दिला आहे. त्यांच्या या कृतीमुळे त्यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला आणि मोदींच्या बोलण्या आणि वागण्यात अंतर नसल्याचे त्यांना दिसून आले. मोदींनी उपस्थितांची मने जिंकली.

३७० वरून अमेरिकेतील काश्मिरी पंडीत भावूक, मोदींच्या हाताचा घेतला मुका!

अमेरिकेत पोहोचल्यानंतर मोदींचे स्वागत करताना त्यांना एक पुष्पगुच्छ देण्यात आले. त्यावेळी एक फुल खाली पडले आणि मोदींनी सर्वांना आश्चर्याचा धक्का देत ते स्वतः उचलले. 

'हाऊडी मोदी' कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मोदी हे जॉर्ज बुश आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. त्यावेळी अमेरिकेच्या प्रतिनिधी मंडळाने त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याचदरम्यान त्या पुष्पगुच्छातील एक फुल खाली पडले. मोदींनी त्वरीत ते उचलले.

ह्यूस्टनला पोहोचले मोदी, ऊर्जा क्षेत्रातील सीईओंची घेतली भेट

बिल अँड मिलिंडा गेट्स फाऊंडेशन लिंकन सेंटरमध्ये पंतप्रधान मोदी यांना 'ग्लोबल गोलकिपर्स अवॉर्ड'ने सन्मानित केले जाईल. हा पुरस्कार त्यांना 'स्वच्छ भारत अभियान'च्या नेतृत्वासाठी दिले जात आहे. २ ऑक्टोबर २०१४ पासून सुरु झालेल्या या कार्यक्रमा अंतर्गत सुमारे १० कोटींहून अधिक शौचालयांची उभारणी भारतात केली गेली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:PM Narendra Modi Win Social Media After This Small Gesture Called swachh bharat Abhiyan Howdy Modi