पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महाविजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी

लोकसभा निवडणुकीत मोठा विजय प्राप्त झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (सोमवार) प्रथमच त्यांच्या वाराणसी मतदारसंघात जाणार आहेत. मोदी हे सकाळी ९.१५ वाजता बाबतपूर विमानतळावर जातील तेथून ते लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून पोलिस लाइन येथे येतील. पोलिस लाइन येथून ते कारमधून काशी विश्वनाथ मंदिरासाठी रवाना होतील. त्यांच्याबरोबर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हेही उपस्थितीत असतील. 

भव्य स्वागताची तयारी

पंतप्रधान मोदी हे पोलिस लाइन ते चौकाघाट, तेलियाबाग, लहुराबीर, मैदागिन, बांसफाटक करत मंदिरात येतील. त्यांच्या स्वागतासाठी चौकाचौकात पक्ष कार्यकर्त्यांनी भाजपचे झेंडे लावले आहेत. कार्यकर्त्यांकडून गुलाब पुष्पाची उधळण करत त्यांचे स्वागत केले जाईल.

कार्यकर्त्यांचे मानणार आभार

मंदिरात सुमारे अर्धा तास दर्शन-पूजा केल्यानंतर ते पोलिस लाइनला परततील. तेथून ते हेलिकॉप्टरने बडालालपूर येथील पं. दीनदयाल उपाध्याय हस्तकला संकुलला जातील. तेथे पक्षाच्यावतीने आयोजित कार्यकर्ता अभिनंद समारोहात ते आभार मानतील. सुमारे पाऊण तासानंतर ते बाबतपूर विमानतळावर रवाना होतील.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:pm narendra modi visit kashi today live updates with amit shah prime minister in kash in today