पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विधयेक संमत होताच मोदी म्हणाले, एक नवी सकाळ वाट पाहत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी

मंगळवारी लोकसभेत जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक संमत झाले. राज्यसभेत आधीच हे विधेयक संमत झाले आहे. आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर त्याचे कायद्यात रुपांतर होणार आहे. दरम्यान, संसदेत या विधेयकावर शिक्कामोर्तब होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या नागरिकांना सलाम केला. एक नवीन सकाळ आणि चांगले भविष्य तुमची वाट पाहत आहे असे त्यांनी म्हटले. विधेयक समंत होताच पंतप्रधान मोदींनी एकापाठोपाठ अनेक टि्वट केले. 

आता ज्योतिरादित्य शिंदेही म्हणाले, कलम ३७० हटवणे देशहिताचेच

पंतप्रधान मोदी आपल्या टि्वटमध्ये म्हणाले की, आपण सर्वजण एकत्रित आहोत. आपण एकत्र १३० कोटी भारतीयांचे स्वप्न पूर्ण करु. जम्मू आणि काश्मीरशी संबंधित विधेयक बहुमताने संमत झाले आहे. आपल्या संसदीय लोकशाहीतील हा एक महत्वपूर्ण क्षण आहे. 

मी जम्मू आणि काश्मीरमधील बंधू आणि भगिनींच्या धैर्याला सलाम करतो. अनेक वर्षांपासून काही स्वार्थी तत्वांनी 'इमोशनल ब्लॅकमेल' केले. लोकांमध्ये गैरसमज पसरवला. विकासाकडे दुर्लक्ष केले. जम्मू आणि काश्मीर, लडाख आता अशा लोकांपासून स्वतंत्र झाला आहे. हे पाऊल जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील युवकांना मुख्य प्रवाहात आणेल. त्याचबरोबर कौशल्य आणि प्रतिभेचे प्रदर्शन करण्याची संधी निर्माण करतील. त्यामुळे पायाभूत सुधारणा होईल. व्यापार उद्योगाला प्रोत्साहन मिळेल. रोजगाराच्या नवीन संधी प्राप्त होतील. आपापसातील अंतर कमी होईल. 

लडाखच्या नागरिकांचे विशेष अभिनंदन. मला या गोष्टीचा आनंद होतो आहे की, केंद्र शासित प्रदेश घोषित करण्याची त्यांची अनेक दशकांची जुनी मागणी आज पूर्ण झाली आहे. या निर्णयामुळे लडाखच्या विकासाला ताकद मिळेल. लोकांच्या जीवनात समृद्धी आणि आनंद दिसेल.

कलम ३७० हटवल्यामुळे संतापलेले इम्रान खान संयुक्त राष्ट्रात जाणार