पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य लाखोंना प्रेरणा देत राहिल - नरेंद्र मोदी

शिवजयंती (फोटो - नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर हँडलवरून साभार)

छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेले कार्य लाखो लोकांना कायमस्वरुपी प्रेरणा देत राहिल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून महाराजांना अभिवादन केले. 

कोरोना विषाणूचा विळखा आणखी घट्ट, चीनमधील मृतांचा आकडा २००० पार

आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, भारतमातेच्या सुपूत्राला माझे नमन. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे धैर्यशीलपणा, दयाशीलता आणि सुप्रशासन याचे उत्तम उदाहरण. त्यांचे कार्य लाखो लोकांना कायम प्रेरणा देत राहिल.

छत्रपती शिवाजी महाराज हे एक पराक्रमी योद्धे आणि कुशल प्रशासक होते. उत्तम नौदल उभारण्यापासून ते लोकोपयोगी धोरणे आखण्याचे काम त्यांनी करून ठेवले. सर्व क्षेत्रातच त्यांनी सर्वोत्कृष्ट काम केले. अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी ते कायमच सर्वांच्या लक्षात राहतील, असेही नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

जळगावमध्ये बिल्डरची गळफास घेऊन आत्महत्या

राज्यात बुधवारी शिवजयंतीचा उत्साह दिसतो आहे. शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे, मिरवणुकांचे विविध ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाचा मुख्य कार्यक्रम होत आहे.