पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मंत्री विदेशात जाणार नाहीत, तुम्हीही जाऊ नका, मोदींचा सल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणू बाबत देशातील नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी एकापाठोपाठ एक टि्वट करुन खबरदारी घेण्यास सांगितले आहे. दहशतीला ना म्हणा तर बचावाला हा म्हणा. केंद्र सरकारमधील एकही मंत्री येणाऱ्या दिवसांत विदेश दौरा करणार नाही. मी आपल्या देशवासियांना आग्रह करतो की आवश्यकता नसेल तर प्रवास करु नका. आम्ही सर्व सभा टाळून सर्वांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊ, असे त्यांनी म्हटले आहे. 

'कोरोना व्हायरस प्रतिबंधक लस यायला दीड ते दोन वर्षे लागतील'

पंतप्रधान मोदींनी आपल्या दुसऱ्या टि्वटमध्ये म्हटले की, कोविड-१९ च्या (कोरोना विषाणू) स्थितीवरुन सरकार सतर्क आहे. सर्व मंत्रालये आणि राज्यांना नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य ती पावले उचलण्यास सांगितले आहे. हा मोठा टप्पा आहे. यात व्हिसाचे निलंबनसह आरोग्य सेवांच्या क्षमता वाढवण्याचाही समावेश आहे. 

विदेशात अडकलेल्या नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत भारतात आणणारः जयशंकर

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी कोरोना विषाणूमुळे इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांबाबत माहिती दिली. ज्या देशात कोरोना विषाणूचा अधिक प्रादुर्भाव आहे. तेथील नागरिकांना आणण्याला प्राधान्य दिले जाईल. सध्या इराण आणि इटलीची स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे सरकारने या देशांवर लक्ष केंद्रित केले आहे. 

'प्रियांका चतुर्वेदींचं इंग्रजी चांगलं, म्हणून संधी मिळाली असेल'

ते म्हणाले, मंगळवारी इराणहून ५८ भारतीय नागरिकांना परत आणण्यात आले आहे. आणखी २००हून अधिक नागरिकांना आणले जाईल. इटलीमध्ये आज एक वैद्यकीय पथक पाठवण्यात येणार आहे. तिथे अडकलेल्या भारतीयांची तपासणी करुन त्यांना परत आणले जाईल.

मला राज्यसभेची अपेक्षाही नव्हतीः एकनाथ खडसे