पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BLOG : 'सोशल मीडियामुक्त भारत' मोहिमेत कोण कोण सामील होणार?

सोशल मीडियावर मोदी लाट

सोशल मीडियाच्या माध्यमातून जन सामान्यांच्या मनात घर करता येते हे दाखवून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियातून एक्झिट घेणार असल्याचे संकेत दिले. (सोशल मीडियाचं राज्य मोदींनी आणलं त्यासंदर्भातून असा उल्लेख केलाय) मोदींनी हा निर्णय नेमका कोणत्या कारणास्तव घेतला? याचाही काही सोशल फंडा आहे का? मोदी आपल्या निर्णयावर ठाम राहतील का? असे अनेक प्रश्न मोदींच्या एका ट्विटने निर्माण केले आहेत. परिणामी मोदींच्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर कोरोना व्हायरसला मागे टाकत मोदी ट्रेंड अव्वल पोहोचल्याचे पाहायला मिळाले.

सोशल मीडिया सोडण्यापेक्षा द्वेष सोडा : राहुल गांधींचा मोदींना टोला

मोदी ट्रेंडिंगमध्ये आल्यावर राहुल गांधी गप्प बसतील तर भारतीय राजकारण कुठे तरी हरवल्यासारखे वाटले असते.
पण मोदींच्या निर्णयावर प्रतिक्रिया देत काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी ही ट्रेंडिंगमध्ये आले. मोदींनी सोशल मीडियावरुन माघार घेण्यापेक्षा द्वेष पसरवणे सोडावे, अशी खोचक प्रतिक्रिया देत राहुल गांधींनी मोदींनी सोशल मीडियावर रहावे, अशी 'मन की बात' बोलून दाखवली. सुधारित नागरिकत्व कायदा मागे घ्यावा यासाठी धडपडणाऱ्या राहुल गांधींंनी खोचक टोमणा मारत का असेना पण मोदींनी सोशल मीडियावर सक्रिय रहावे असा पहिला सल्ला दिला तो त्यांनीच. त्यानंतर मोदींनी सोशल मीडियावर कायम रहावे हा हॅश टॅग ट्रेंडिंगमध्ये आला. 

PM मोदी सोशल मीडियाला 'रामराम' करण्याच्या विचारात

#NoSir या हॅशटॅगच्या माध्यमातून मोदींनी सोशल मीडियापासून दूर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी होण्यास सुरुवात झाली. मोदींवर खोचक टीका करुन त्यांना सोशल मीडियावर सक्रीय राहण्याचा सल्ला देणाऱ्या राहुल गांधीवर संताप व्यक्त करण्यासाठी नेटकऱ्यांनी #Pappu नावाचा हॅशटॅगही ट्रेंडमध्ये आणला. द्वेषावर भाष्य करणाऱ्या राहुल गांधींवर संताप व्यक्त करण्यासाठी तयार झालेल्या   #Pappu या हॅशटॅगने मोदींनाही काही काळ मागे टाकल्याचे पाहायला मिळाले. लोकसभेच्या निवडणुकीनंतर सोशल मीडियावर नमोvsरागा फाइटची झलक पुन्हा दिसून येत आहे. 

अमृता फडणवीस म्हणाल्या, PM मोदींचा निर्णय फॉलो करेन!

मोदींच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर उसळलेली लाट नक्की कोणते वळण घेणार येणाऱ्या दिवसांत पाहायला मिळेल. लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात #चौकीदारही चोर है! हा हॅशटॅग चांगलाच गाजला होता. काँग्रेसच्या या नाऱ्याला मोदींच्या नाऱ्याने हाणून पाडले होते. प्रत्येक जणाने मोदींच्या समर्थनार्थ #मै भी चौकीदार या हॅशटॅग खाली नेटकऱ्यांनी मोदींना साथ दिल्याचे पाहायला मिळाले. पण सोशल मीडिया सोडण्याच्या मोदींच्या निर्णयाला खरंच असा प्रतिसाद मिळेल का? 

'नटसम्राट' श्रीराम लागूंच्या नावाने महाराष्ट्र सरकार देणार पुरस्कार

अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांमध्ये स्मार्टफोनही ही मुलभूत गरज नव्या काळात निर्माण होताना दिसत आहे. स्मार्टफोन युजर्ससाठी सोशल प्लॅटफॉर्म हा आत्मा आहे. स्मार्ट लोक सोशल मीडियाशिवाय जगू शकत नाहीत, असेच युग निर्माण झाले आहे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अशा परिस्थितीत मोदींनी खेळलेल्या डावात कोण-कोण सहभागी होणार हे पाहणे औत्सुकतेचे ठरेल. सध्याच्या घडीला मोदींनी फक्त मनातील विचार बोलून दाखवला आहे. त्यांच्या मनात नेमक काय आहे याबाबत ते लवकरच मौन सोडतील. पण मोदी सोशल मीडियापासून दूर राहण्याच्या निर्णयावर ठाम राहिले तर त्यांना साथ देत देशातील तमाम तरुणाई सोशल जाळ्यातून बाहेर पडून मोदींना साथ देण्यासाठी 'सोशल मीडियामुक्त भारत' हा नवा नारा देण्याचं धाडस दाखवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

-सुशांत जाधव

Email -Sushantjournalist23@gmail.com

Twitter- @2010Sushj

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:PM Narendra Modi Tweet About giving up social media Rahul Gandi reaction both leader trending on Social Media Special Blog On New Trend and netizens mind by Sushant Jadhav